Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका, Altroz चे रेसर व्हेरिएंट लाँच; फीचर्स खूपच जबरदस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Altroz Racer

Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका, Altroz चे रेसर व्हेरिएंट लाँच; फीचर्स खूपच जबरदस्त

Tata Motors Altroz Racer details: टाटा मोटर्सने (Tata Motors) ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अल्ट्रोज हॅचबॅकचे आतापर्यंतचे सर्वात स्पोर्टी व्हर्जन Altroz Racer ला सादर केले आहे. या नवीन हॅचबॅकमध्ये अनेक बदल करण्यात आले असून, यात १०.२५ इंच टचस्क्रीन, एक नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि सनरूफ देण्यात आले आहे.

अल्ट्रोज रेसरचा लूक आणि एक्सटीरियर स्टाइल नियमित अल्ट्रोज सारखेच आहे. मात्र, यात वॉइस असिस्टसह इलेक्ट्रिकल अ‍ॅडजस्टेबल सनरुफ सारखे नवीन फीचर्स मिळतील.

कारच्या फ्रंट लूकबद्दल सांगायचे तर यात रुंद क्रोम बार देण्यात आला आहे. तसेच, शानदार हेडलाइट्स, ब्लॅक्ड-आउट रुफ आणि ट्विन व्हाइट रेसिंग स्ट्राइप्ससह बोनट मिळेल. मागील बाजूला शार्क फिन अँटिना दिला आहे. तर एलॉय व्हील्स आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे.

हेही वाचा: Airtel Plans: अवघ्या ३५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन लाँच, बेनिफिट्स एकदा पाहाच

Tata Altroz Racer चे इंटेरियर आणि फीचर्स

टाटा अल्ट्रोज रेसरमध्ये रेड काँट्रस्ट स्टिचिंग, रेड आणि व्हाइट स्ट्राइप्ससह नवीन ऑल-ब्लॅक अपहोल्स्ट्री आणि हेड रेस्ट्रेंटवर रेसर अ‍ॅम्बॅसिंग देण्यात आली आहे. यामध्ये नवीन सॉफ्टवेअरसह नवीन १०.२५ इंच टचस्क्रीन यूनिट मिळेल. याशिवाय, ७.० इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ६ एअरबॅग्स, वायरलेस चार्जिंग आणि एक फ्यूरीफायर स्टँडर्ड देण्यात आले आहे.

हेही वाचा: Flipkart Sale: बंपर डिस्काउंट! खूपच स्वस्तात मिळतोय Samsung चा 5G फोन, पाहा डिटेल्स

Tata Altroz Racer चे इंजिन आणि पॉवर

Tata Altroz Racer चे सर्वात मोठे वैशिष्ट्ये याचे पॉवरट्रेन आहे. यात देखील Altroz iTurbo प्रमाणेच १.२ लीटर, ३ सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १२० एचपी पॉवर आणि १७० एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन ६ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्ससह येते.

दरम्यान, Tata Altroz Racer ची विक्री कधी सुरू होणार याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, विक्री सुरू झाल्यावर ही हॅचबॅक Hyundai i20 N Line ला टक्कर देईल.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

टॅग्स :carTata MotorsAuto Expo