OLA मोफत देणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या ऑफर

चॅलेंज पूर्ण केल्यास 10 लोकांना ओला मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देणार आहे.
OLA offer
OLA offerSakal

तुमच्याकडे ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric) मोफत जिंकण्याची उत्तम संधी आहे. कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी ही ऑफर आणली आहे. त्यांनी सांगितले आहे की, यासाठी तुम्हाला तुमची स्कूटर एका चार्जमध्ये 200 किलोमीटर चालवावी लागेल. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही ओला स्कूटर मोफत जिंकू शकता. यापूर्वी दोन लोकांनी या ऑफरचा लाभ घेत मोफत स्कूटर जिंकल्या आहेत. आता भाविश आणखी 10 ग्राहकांना ओला स्कूटर मोफत देणार आहेत.

OLA offer
5 मिनिटात चार्ज होईल Ola Electric स्कूटर; इस्रायली कंपनीशी केला करार!

जूनमध्ये फ्युचरफॅक्टरीमधून दिली जाईल डिलिव्हरी

भाविश यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'लोकांचा उत्साह पाहता, एका चार्जवर २०० किमीचे अंतर पार करणाऱ्या आणखी १० ग्राहकांना आम्ही मोफत गेरू स्कूटर देऊ! आमच्याकडे असे 2 ग्राहक आहेत ज्यांना हे करून मोफत स्कूटर मिळाल्या आहेत, एक ग्राहक MoveOS 2 आणि एक 1.0.16. हा पराक्रम स्कूटरवर केला आहे. त्यामुळे कोणीही टार्गेट पूर्ण करू शकतो! आम्ही विजेत्यांना जूनमध्ये त्यांच्या वितरणासाठी फ्युचरफॅक्टरीमध्ये आमंत्रित करू!'

एका युजरने सिंगल चार्जवर 266 किमी चालवली स्कूटर-

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की एका ग्राहकाने एका चार्जमध्ये 200+ किमीचा टप्पा ओलांडला आहे. पूर्वेश प्रभू नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने स्कूटरच्या डिजिटल मीटरचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि सांगितले की त्याने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत आणि ओला स्कूटरच्या सिंगल चार्जने 266 किलोमीटरचे अंतर कापले आहे. भाविश यांनी हे ट्विट रिट्विट करत पूर्वेशचे अभिनंदन केले. ते म्हणाले की तू चॅम्पियन आहेस आणि मला खात्री आहे की तू लवकरच 300 चा टप्पा पार करशील.

OLA offer
Ola S1 Pro महागणार! आजच बूक करा तुमची Gerua स्कूटर

ओएसमधील बिघाडामुळे झाला होता अपघात -

ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच आपल्या स्कूटरसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम MoveOS2 आणले आहे. स्कूटरबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारींनंतर कंपनीने ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली. मात्र, यापूर्वी या ओएसमधील बिघाडामुळे एका वृद्धाचा अपघात झाला होता. त्याच्या ओला स्कूटरने रिव्हर्स गियरमध्ये 50Km/h पेक्षा जास्त वेग पकडला होता. स्कूटरला आग लागल्यानंतर कंपनीने 1,411 ओला स्कूटरही परत मागवल्या होत्या.

स्कूटरची किंमत 10 हजार रुपयांनी वाढली-

आता ही स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिक बजेट लागेल. वास्तविक, कंपनीने S1 Pro मॉडेलची किंमत 10,000 रुपयांनी वाढवली आहे. म्हणजेच आता त्याची नवीन एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपये झाली आहे. मात्र, कंपनीने किंमत वाढवण्याचे कारण दिलेले नाही. कंपनीने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 1.30 लाख रुपयांच्या किंमतीसह S1 Pro लाँच केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com