BSNL ची स्पेशल ऑफर! Amazon Fire Tv Stick मोफत; जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL New Year Offer
BSNL ची स्पेशल ऑफर! Amazon Fire Tv Stick मोफत; जाणून घ्या

BSNL ची स्पेशल ऑफर! Amazon Fire Tv Stick मोफत; जाणून घ्या

BSNL नवीन वर्ष ऑफर 2022 (BSNL New Year Offer):

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षात नवी ऑफर आणली आहे, या ऑफरसह कंपनी Amazon Fire Tv Stick देत आहे. बीएसएनएलनं ही ऑफर कोणत्या ग्राहकांसाठी आहे आणि तुम्ही त्याचा लाभ कसा घेऊ शकता, याबद्दल आपण जाणून घेऊया

BSNL ची ही ऑफर कंपनीच्या भारत फायबर (Bharat Fibre FTTH), एअर फायबर आणि DSL ब्रॉडबँड ग्राहकांसाठी आहे. मोफत Amazon Fire Tv Stick साठी, वापरकर्त्यांना 999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल.

हेही वाचा: BSNL : एकदाच रिचार्ज करा वर्षभर झंझट विसरा, मिळेल फ्री कॉलिंग, डेटा

असा करा अर्ज (How to Apply?)-

BSNL वापरकर्त्यांना BSNL BOSS पोर्टलला भेट देऊन वार्षिक पेमेंट योजनेसाठी (Annual Payment Scheme) अर्ज करावा लागेल, ज्या वापरकर्त्यांनी रु. 999 पेक्षा कमी किमतीच्या प्लॅनची ​​निवड केली आहे त्यांना त्यांचा प्लॅन रु. 999 किंवा त्याहून अधिक किंमतीच्या प्लॅनमध्ये अपग्रेड करावा लागेल. अपग्रेड करण्यासाठी, तुम्ही BSNL Selfcare Portal किंवा BSNL ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊन देखील Upgrade करू शकता.

हेही वाचा: VI च्या 'या' रिचार्ज वर दररोज ३ जीबी डाटा अन्...

BSNL BOSS पोर्टलला भेट देऊन तुमचे डिव्हाइस निवडा आणि वार्षिक पेमेंट योजनेअंतर्गत एका वर्षाच्या सदस्यतेसाठी ऑनलाइन एडव्हान्स पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर, डिव्हाइस तुमच्या बिलिंग पत्त्यावर वितरित केला जाईल.

केरळ टेलिकॉमच्या अहवालानुसार, ही BSNL ऑफर सर्व सर्कलमध्ये उपलब्ध असेल, परंतु Amazon Fire TV स्टिक लाइट DSL/Fibre/AirFibr वापरकर्त्यांना किमान रु.999 ची वार्षिक सदस्यता घ्यावी लागेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top