esakal | इलेक्‍ट्रिकचे रस्ते! प्रवास करता करता होईल कारची चार्जिंग
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्‍ट्रिकचे रस्ते! प्रवास करता करता होईल कारची चार्जिंग

पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनापासून प्रदूषणाचे मोठे संकट मानवासमोर उभे आहे. लोकसंख्यावाढ काहीशी नियंत्रणात येत आहे. परंतु, चारचाकी विक्री आणि ती घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे. परिणामी इंधनाचे दरही वाढतच आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी इंधनाऐवजी अन्य पर्यायांवर अनेक दशकांपासून संसोधन सुरू आहे. यातून इलेक्‍ट्रिक कारची निर्मिती करण्यात आली. प्

इलेक्‍ट्रिकचे रस्ते! प्रवास करता करता होईल कारची चार्जिंग

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : इलेक्‍ट्रिक कार म्हणजे नको ती झंझट, असे विनोदाने बोलले जाते. कारण, पर्यावरणपूरक असूनही बॅटरी चार्जिंगच्या समस्येमुळे ही कार खरेदी करताना नागरिक नाक मुरडतात. याचा विचार करून इलेक्‍ट्रिक कार चालताना चार्जिंग झाली तर काय मज्जा येईल, असे काही तंत्रज्ञांच्या मनात आले. त्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आणि जगापुढे मांडला आगळावेगळा प्रयोग. हा प्रयोग होता इलेक्‍ट्रिक (विद्युत) रस्त्यांचा. (Electric-roads-Car-charging-Save-Petrol-Diesel-Pollution-from-fuel-Environmental-protection-nad86)

पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनापासून प्रदूषणाचे मोठे संकट मानवासमोर उभे आहे. लोकसंख्यावाढ काहीशी नियंत्रणात येत आहे. परंतु, चारचाकी विक्री आणि ती घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे. परिणामी इंधनाचे दरही वाढतच आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी इंधनाऐवजी अन्य पर्यायांवर अनेक दशकांपासून संसोधन सुरू आहे. यातून इलेक्‍ट्रिक कारची निर्मिती करण्यात आली.

हेही वाचा: शाळेच्या प्रांगणात पोहोचताच शिक्षकांचा उडाला थरकाप

प्रारंभी याचे जगभरातून मोठे स्वागत झाले. कालांतराने यातील अडचणी आणि समस्या समोर येत गेल्याने इलेक्‍ट्रिक कारवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. सर्वांत मोठी अडचण आहे बॅटरी चार्ज करण्याची. कारण, यासाठी फार वेळ लागतो. शिवाय सर्व्हिस स्टेशनवर बॅटरी ठेवल्यास त्याची सुरक्षितता आणि पुन्हा ती मिळविण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार हे ओघाने आलेच.

कल्पनेची भरारी घेत आणि ही बाब प्रत्यक्षात आणली स्वीडन आणि इस्राईलच्या तंत्रज्ञ, संशोधकांनी. या देशांमध्ये काही ठिकाणी असे इलेक्‍ट्रिक रस्ते तयार करण्यात आले असून, त्यांचे प्रयोग आश्‍वासक आहेत. अनेक देशांनी यापुढील तंत्राचा वापर करण्यावर भर दिला आहे. लवकरच जगभरात इलेक्‍ट्रिक रस्ते, चारचाकी वाहने जागोजागी दिसली तर नवल वाटायला नको, असे जाणकारांचे मत आहे.

आवाज नाही. धूरही नाही. एकदम आरामशीर प्रवास. विशेष म्हणजे तुमच्या आवडीची इलेक्‍ट्रिक कार चालत असतानाच चार्ज होत आहे. यामुळे किती दूर जायचे याचे मुळीच टेन्शन राहणार नाही. भारतात हा प्रयोग किती यशस्वी होईल हे काही सांगता येणार नाही. यासाठी वेगळे रस्ते आणि अवांतर खर्च व तंत्रज्ञानही लागणार आहे.
- नितीन साळवे, मेकॅनिकल इंजिनिअर

हेही वाचा: शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकणार

फायदे

  • कार रस्त्यावर चालतानाच होणार चार्जिंग

  • हवा स्वच्छ राहील. प्रदूषणात घट शक्‍य

  • देशाची इंधन आयात कमी होऊन पैसा वाचेल

  • रिचार्ज करण्यासाठी पंपवरील फिल-अपपेक्षा कमी वेळ

  • इलेक्‍ट्रिक वाहने ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन कमी करतील

अडचणी

  • खर्चिक असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज

  • बॅटरी महाग आहेत. चार्जिंग स्टेशनची कमतरता

  • विद्युत महामार्गांची निर्मिती करावी लागेल

(Electric-roads-Car-charging-Save-Petrol-Diesel-Pollution-from-fuel-Environmental-protection-nad86)

loading image
go to top