Comparison of Jio, Airtel & Vi : किंमत एकच पण बेनिफिट्स अन् प्लॅन्स वेगवेगळे, जाणून घ्या सविस्तर

जिओच्या तुलनेत वोडाफोन, एअरटेलकडे देखील समान किंमतीचे प्लॅन आहेत मात्र Jio च्या प्लॅनपेक्षा हे प्लॅन्स फारच वेगळे आहे
Comparison of Jio, Airtel & Vi
Comparison of Jio, Airtel & Viesakal

Comparison of Jio, Airtel & Vi : अलीकडेच जिओने आपल्या यूजर्ससाठी दोन नवीन बूस्टर प्लॅन लॉन्च केले आहेत, ज्यांची किंमत 19 आणि 29 रुपये आहे. या प्लॅनद्वारे यूजर्सना अतिरिक्त डेटाचा लाभ मिळू शकतो. मात्र तुम्हाला माहितीये का? एकाच किंमतीत वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे बेनिफिट्स यूजर्सना देत असतात. जिओच्या तुलनेत वोडाफोन, एअरटेलकडे देखील समान किंमतीचे प्लॅन आहेत मात्र Jio च्या प्लॅनपेक्षा हे प्लॅन्स फारच वेगळे आहे.

Reliance Jio ने दोन नवीन डेटा बूस्टर प्रीपेड व्हाउचरची घोषणा केली आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 19 आणि 29 रुपये आहे. नवीन डेटा बूस्टर प्लॅन्स अॅड-ऑन डेटासह येतात जे यूजर्स अधिक डेटा मिळविण्यासाठी त्यांच्या बेस प्लॅनवर टॉप अप करू शकतात.

वोडाफोन आणि एअरटेलबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे देखील त्यांच्या प्रीपेड यूजर्ससाठी बरेच प्लॅन्स आहेत. दोन्ही कंपन्या बेस प्लॅनवर एक्स्ट्रा डेटा बेनिफिट्स देतात.

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन प्लॅन्स

19 रुपयांचा डेटा बूस्टर प्लान

रिलायन्स जिओच्या 19 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये 1.5GB डेटा येतो. या प्लॅनसाठी कोणतीही व्हॅलिडीटी नाही आणि ती यूजर्ससाठी आधीच केलेल्या प्रीपेड प्लॅनच्या व्हॅलिडिटीवर अवलंबून आहे.

एअरटेलचा 19 रुपयांचा डेटा बूस्टर प्लान देखील आहे, जो 1GB डेटासह येतो. म्हणजेच, Jio त्याच रकमेसाठी 500MB अधिक डेटा देत आहे. यासोबतच या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 1 दिवसाची आहे.

Comparison of Jio, Airtel & Vi
VIP नंबर हवाय? JIO ची नवी ऑफर अन् Process जाणून घ्या...

Vi चा 19 रुपयांचा डेटा प्लान देखील आहे, जो 1GB डेटा आणि 24 तासांच्या व्हॅलिडिटीसह येतो. याचा अर्थ Jio कडे ऑफरवर 500MB अधिक डेटा आहे. तसेच, जिओच्या प्लॅनची ​​स्वतःची कोणतीही व्हॅलिडिटीही नाही त्यामुळे बेस प्लॅनची ​​व्हॅलिडिटी संपेपर्यंत हा प्लॅन व्हॅलिड असेल.

२९ रुपयांचा डेटा बूस्टर प्लान

19 रुपयांच्या डेटा पॅकप्रमाणे, या तिन्ही टेलिकॉम ऑपरेटर्सकडे 29 रुपयांचा डेटा पॅक आहे. रिलायन्स जिओ या प्लॅनमध्ये 2.5GB डेटा देत आहे. ज्यामध्ये व्हॅलिडिटी नसून ते बेस प्लॅनच्या वैधतेवर अवलंबून असते.

Comparison of Jio, Airtel & Vi
Smartphone Users : फोनची बॅटरी कमी-कमी होत गेली की अस्वस्थता वाढत जाते; तुम्हालाही आहे का हा आजार ?

तर एअरटेल आपल्या यूजर्सना 29 रुपयांमध्ये 2GB डेटा ऑफर करत आहे, तर Vi देखील या प्लॅनसह 2GB डेटा ऑफर करत आहे. यात एअरटेल 1 दिवसाची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे तर Vi 2 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. म्हणजेच प्लॅनची ​​वैधता संपल्यानंतर 2GB डेटा काढून टाकला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com