Smartphone Users : फोनची बॅटरी कमी-कमी होत गेली की अस्वस्थता वाढत जाते; तुम्हालाही आहे का हा आजार ?

इतर कामे करताना किंवा त्यात व्यग्र असताना फोन वापरण्याच्या सवयीमुळे स्मार्टफोनची बॅटरी कमी होण्याची चिंता निर्माण झाली होते.
Smartphone Users
Smartphone Usersgoogle

मुंबई : स्मार्टफोनच्या वाढत्या व्यसनामुळे बॅटरी संपुष्टात आल्याने सुमारे ६५% वापरकर्ते काही प्रकारच्या भावनिक अस्वस्थतेतून जातात. काउंटरपॉईंट आणि OPPO च्या NoMoPhobia (नो-मोबाइल फोबिया) अभ्यासानुसार ७२% लोक २०% किंवा त्यापेक्षा कमी बॅटरीबाबत चिंताग्रस्त असतात.

विश्लेषकांच्या मते, स्मार्टफोन वापरकर्त्यांना बॅटरी कमी होण्याबद्दल चिंता वाटण्याची कारणे गमावण्याची भीती, सोशल मीडियापासून डिस्कनेक्शन, मनोरंजन गमावणे आणि महत्त्वाचे काम करण्यास असमर्थता ही आहेत.

इतर कामे करताना किंवा त्यात व्यग्र असताना फोन वापरण्याच्या सवयीमुळे स्मार्टफोनची बॅटरी कमी होण्याची चिंता निर्माण झाली होते. (Smartphone Users faces mobile fobia people feel anxiety for low battery )

Smartphone Users
No Diet Day : इंटरनॅशनल नो डाएट डे का साजरा केला जातो ?

स्मार्टफोन अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये अव्वल राहण्यासाठी, सर्वेक्षण केलेल्यांपैकी निम्मे लोक दिवसातून दोनदा त्यांचे स्मार्टफोन चार्ज करतात, असे अहवालात म्हटले आहे.

“मनोरंजन ते अधिकृत कामापासून ते इतरांशी संपर्क साधण्यापर्यंत सर्वच कामांसाठी स्मार्टफोनचा उपयोग होतो. परिणामी, लोकांना त्यांचा फोन वापरता न येण्याचा फोबिया विकसित झाला आहे,” काउंटरपॉईंटचे संशोधन संचालक तरुण पाठक म्हणाले.

“सोशल मीडियासाठी स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जातो. लोकांना त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी गमावण्याची भीती असते. म्हणूनच बहुतेक लोक चार्जिंगच्या संधी शोधत राहतात आणि बॅटरी संपल्याच्या विचाराने आणि त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करू शकत नसल्याबद्दल चिंताग्रस्त होतात,” पाठक म्हणाले. ३१-४० वयोगटातील सर्वात जास्त त्यानंतर २५-३० वयोगटात ही गोष्ट दिसून आली आहे.

Smartphone Users
Hand Sanitation : हातांच्या स्वच्छतेची ही पद्धत तुम्हाला आयुष्यभर ठेवेल निरोगी

काउंटरपॉईंटने टियर 1 आणि टियर 2 शहरांमधील १५०० लोकांच्या नमुन्यासह सर्वेक्षण केले. भारतातील स्मार्टफोन वापरकर्त्यांमधील कमी बॅटरीची चिंता समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण OPPO द्वारे प्रायोजित करण्यात आले होते. सर्वेक्षण केलेल्या लोकांपैकी २५% लोकांकडे सॅमसंग फोन, १८% लोकांकडे Xiaomi फोन आणि Vivo फोन प्रत्येकी, १३% Realme आणि ११% OPPO आहे.

बहुसंख्य प्रतिसादकर्ते १५ हजार ते २५ हजार रुपयांच्या श्रेणीतील फोन वापरत होते. असेही आढळून आले आहे की ४०% लोक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर सकाळी ते उठल्याबरोबर आणि शेवटी ते झोपण्यापूर्वी करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com