Gmail द्वारे सिक्रेट मेसेज पाठवणे अगदी सोपं; जाणून घेऊया प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gmail

तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही Gmail द्वारे सिक्रेट मोड ऑन करीत सिक्रेट मेसेजही पाठवू शकता. हा सिक्रेट मोड तुम्ही तुमच्या संगणक, लॅपटॉप तसेच आयफोनवर ही वापरू शकता. तुमच्या फोनवर तुम्ही अगदी साध्यापध्दतीने हा सिक्रेट मोडचा वापर करू शकता. यासंदर्भात प्रक्रिया जाणून घ्या.

Gmail द्वारे सिक्रेट मेसेज पाठवणे अगदी सोपं; जाणून घेऊया प्रक्रिया

आजच्या सोशियल मीडीयाच्या युगात जग खुप जवळ आले आहे. संवाद साधण्यासाठी सोशियल मीडीयाच्या माध्यमातून अनेक पर्याय आपल्याकरीता उपलब्ध आहे. त्यातलाच एक पर्याय म्हणजे Gmail. आज Gmail मुळे जगभरातील असंख्य लोक एकमेकांशी संवाद साधू शकतात आणि ऑनलाईन पध्दतीने पत्रव्यव्हार करु शकतात पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही Gmail द्वारे सिक्रेट मेसेजही पाठवू शकता.

हेही वाचा: BSNL चे चार नवे स्वस्त प्रीपेड प्लॅन; अमर्यादित कॉलिंगसह मिळेल डेटा

सिक्रेट मोड ऑन करीत तुम्ही गोपनीय पध्दतीने मेसेज पाठवू शकता. या मेसेज मधील सर्व माहिती सुरक्षित असेल आणि हॅकर्सही तुमची माहिती हॅक करू शकणार नाही. गोपनीय पध्दतीने तुम्ही कोणत्याही प्रकाराचे मेसेज पाठवू शकता.

हेही वाचा: होंडाने भारतात लॉन्च केली नवीन CB300R, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

हा सिक्रेट मोड तुम्ही तुमच्या संगणक, लॅपटॉप तसेच आयफोनवर ही वापरू शकता. तुमच्या फोनवर तुम्ही अगदी साध्यापध्दतीने हा सिक्रेट मोडचा वापर करू शकता. यासंदर्भात प्रक्रिया जाणून घ्या.

१. सर्व प्रथम तुमच्या डिव्हाइसवर Gmail खाते उघडले असावे.

२. कंपोज मेसेजच्या ऑप्शन वर क्लिक करून खाजगी मोड सुरू करावा.

३. ईमेलसाठी गोपनीय मोड चालू करा यानंतर मेसेजची समाप्ती तारीख आणि पासकोड सेट करा.

४. Gmail न वापरणाऱ्या युजर्सला एक पासकोड ईमेल केला जातो. जर तुम्ही SMS पासकोड निवडलात तर युजर्सला मेसेजद्वारे पासकोड प्राप्त होईल.

५. त्यानंतर तुम्ही सेंड वर क्लिक करून मेसेज पाठवू शकता.

सिक्रेट मोडमध्ये पाठवलेला मेल तुम्ही पासकोड टाकून उघडू शकता. सोबत हे मेसेज किंवा मेल फक्त समाप्ती तारखेपर्यंत तुम्ही बघू शकता.

हेही वाचा: जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप बाइक्स; किंमत आहे तुमच्या बजेटमध्ये

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top