Electric Vehicle : मोबाईलच्या किंमतीत घरी आणा EV | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Vehicle

Electric Vehicle : मोबाईलच्या किंमतीत घरी आणा EV

Electric Vehicle : सध्याचा काळ हा इलेक्ट्रिक वाहनाचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण वाढतं प्रदुषण आणि वाढते प्रेट्रोलचे दर यामुळे सरकार सुध्दा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. पण या वाहनांची किंमत ग्राहकांसाठी मोठा प्रश्न निर्माण करतात.

अशावेळी इलेक्ट्रिक वाहन कंपन्यापण वेगवेगळे प्रयोग करतात. त्यातूनच अगदी मोबाईलच्या किंतीतही मिळेल असं वाहन सध्या बाजारात आलं आहे. हिरो सायकल्सच्या इलेक्ट्रिक सायकल ब्रांचने हिरो लॅक्ट्रोने भारतीय बाजारात दोन नवे मॉडेल लाँच केले आहेत. नव्या इलेक्ट्रिक सायकलमध्ये H3 आणि H5 यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Electric Car : आवडीची EV खरेदी न करता चालवता येणार; 'ही' कंपनी देतीये जबरदस्त ऑफर

यातल्या एच ३ इलेक्ट्रिक सायकलची किंमत २७ हजार ४४९ तर एच ५ ची किंमत २८ हजार ४४९ रूपये आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक सायकलचा मागणी लक्षात घेता कंपनीने फिचर लिस्ट आणि दोन्ही मॉडेल्सची मजबूती यावर भर दिलेला आहे.

हेही वाचा: EV Fire : 'या' पाच कारणांमुळे इलेक्ट्रिक बाइकमध्ये स्फोट होतो

या सायकलींना पहिल्यांदा इलेक्ट्रिक सायकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन बाजारात आणलं आहे.

कंपनीचा दावा आहे की, असिस्टेड पेडलिंगवर ३० किलोमीटरपर्यंत तर थ्रॉटल ओनली मोडवर २५ किलोमीटर पर्यंत प्रती चार्ज रेंज मिळते.

ही इलेक्ट्रिक सायकल IP67 ली-आयन 5.8Ah इंट्यूब बॅटरी पेक्षा कमी असून पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. ही बॅटरी साधारण ४ तासात फूल चार्ज होते.

हेही वाचा: EV लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी भारताला हवी 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक : अहवाल

जाणून घ्या फिचर्स

  • या दोन्हा सायकलींमध्ये 250W बीएलडीसी रियर हब मोटरचा वापर केला आहे.

  • दोन्ही सायकलच्या हँडलबारवर स्मार्ट एलईडी डिस्प्ले लावलं आहे.

  • पहिल्यांदाच ड्युल डिस्क ब्रेक दोन्ही सायकलमध्ये देण्यात आले आहेत.

  • याला स्टील फ्रेम आणि डस्ट प्रोटेक्शन गॅरंटी आहे.

हेही वाचा: EV bike : १ रुपयात ५ किमी चालेल ही स्कूटर; फक्त १० हजारांत आणा घरी

व्यायाम आणि प्रवास करा सोबत

सध्या लोकांच्या आयुष्यात धावपळ वाढली आहे. त्यामुळे व्यायामाला वेळ काढणं त्यांच्यासाठी कठीण होत आहे. अशा लोकांमध्ये इलेक्ट्रिक सायकल विशेष लोकप्रिय आहे. कमी लांबच्या अंतरासाठी सायकलने जाणं पसंत करून व्यायाम आणि प्रवास असे दोन्हा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न असतो.

टॅग्स :electric bike