NASA Europa Mission : गुरूच्या युरोपा चंद्रावर पोहोचणार 'पाणी'; नासाची अनोखी मोहीम.. भारताचाही मोलाचा वाटा!

Jupiter Moon : युरोपा’वर पृथ्वीवरील सर्व समुद्र, महासागरांच्या तुलनेत दुपटीने पाणी असल्याचा अंदाज आहे. तेथील पाण्याचे स्रोत आणि पाण्यामुळे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते का, याचा अभ्यास युरोपा क्लिपर मोहिमेतून करणार आहे.
NASA Europa Mission
NASA Europa MissioneSakal

NASA Europa Mission : पाणी सापडण्याची शक्यता असलेल्या युरोपा या गुरू ग्रहाच्या चंद्राच्या अभ्यासासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ युरोपा क्लिपर मोहिमेअंतर्गत यान पाठविणार असून त्याबरोबर सांकेतिक शब्दही पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा शब्द हिंदीसह १०३ भाषांत ध्वनिमुद्रित केला आहे.

‘युरोपा’वर (Jupiter Moon Europa) पृथ्वीवरील सर्व समुद्र, महासागरांच्या तुलनेत दुपटीने पाणी असल्याचा अंदाज आहे. तेथील पाण्याचे स्रोत आणि पाण्यामुळे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते का, याचा अभ्यास युरोपा क्लिपर (Europa Clipper Mission) मोहिमेतून करणार आहे. ही मोहीम यंदा ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात येणार आहे. यानातून युरोपावर पाठविण्यासाठी पृथ्वीवर बोलल्या जाणाऱ्या १०३ भाषांमधील ‘पाणी’ हा शब्द ध्वनिमुद्रित केला आहे. यात हिंदीचाही समावेश आहे.

हे शब्द ‘टँटलम’ या धातूपासून बनविलेल्या ७ बाय ११ इंचाच्या पट्टीवर रेखांकीत केले आहेत. ‘‘जगभरातील १०३ भाषांमध्ये बोलल्या जाणाऱ्या ‘पाणी’ या शब्दाचे ध्वनिमुद्रण भाषाशास्त्रज्ञांनी गोळा केले आहे. हे तरंगध्वनी धातूच्या पट्टीवर रेखांकीत केले असून त्यातील एका तरंगध्वनीतून हिंदीतून ‘पाणी’ असे उच्चारण ऐकू येते,’’ असे ‘नासा’ने सांगितले.

NASA Europa Mission
Japan Rocket Explodes : टेक ऑफनंतर काही सेंकदातचं उडाल्या ठिकऱ्या! जपानच्या पहिल्या प्रायव्हेट रॉकेटचा Video Viral

कविताही ‘युरोपा’वर

‘युरोपा क्लिपर’ यानातून ध्वनितरंग पट्टीबरोबरच अमेरिकेचे प्रख्यात कवी ॲडा लिम यांची ‘इन प्रेज ऑफ मिस्ट्ररी : ए पोएम फॉर युरोपा’ या कवितेचे हस्तलिखितही पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर जगभरातील २६ लाख लोकांच्यी नावांची नोंद असलेली सिलिकॉन मायक्रोचिपही पाठविण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या व्हॉएजर मोहिमेच्यावेळी अंतराळारात पाठविण्यात आलेल्या ‘गोल्डन रेकॉर्ड’वरून ‘युरोपा’ मोहिमेत पाण्याचा संदेश पाठविण्याची कल्पना सुचली होती. सर्व प्रकारच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याद्वारे पृथ्वी आणि या रहस्यमय महासागराशी संबंध जोडण्यासाठी हा संदेश महत्त्वपूर्ण आहे.’’

- लोरी ग्लेझ (संचालक, ग्रह विज्ञान विभाग, नासा)

NASA Europa Mission
Adrit Rao : अवघ्या 16 वर्षांचा मुलगा झालाय 'एआय'चा बादशाह; 'अ‍ॅपल'नेही केलंय कौतुक.. आता दिव्यांगांसाठी तयार करतोय अ‍ॅप!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com