महिनाअखेर करा ही 2 महत्वाची कामे; नाहीतर होईल आर्थिक नुकसान

एलआयसी पॉलिसीधारक (LIC) आणि सरकारी निवृत्तीवेतन (Pensioners) धारकांसाठी या आठवड्यात काही गोष्टींची पुर्तता करावी लागणार आहे.
 Money
Moneyesakal

आजच्या काळात सतत आपल्याला अपडेट राहावं लागतं. सरकारी पातळीवर सतत काहीना काही नियम येत असतात. त्यानुसार आपल्याला कामे करून घ्यावी लागतात. आर्थिक (Financial) तसेच बँकाच्या बाबतीत वरचेवर आपल्याला काहीना काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. या महिनाअखेरही आपल्याला दोन महत्त्वाची आर्थिक कामे करावी लागणार आहेत. त्यात फेब्रुवारी (February) महिना फक्त 28 दिवसांचा असतो. त्यामुळे तुमच्याकडे आता फक्त एक आठवडा आहे. या आठवड्यात जर ती कामे झाली नाहीत तर तुम्हाला आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकते. एलआयसी पॉलिसीधारक (LIC) आणि सरकारी निवृत्तीवेतन (Pensioners) धारकांसाठी या आठवड्यात काही गोष्टींची पुर्तता करावी लागणार आहे. (For LIC policyholders and government pensioners, there are a few things to keep in mind this week.)

 Money
LIC चा सेबीकडे IPOसाठी अर्ज! मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा

1. एलआयसी (LIC) पॉलिसी धारकांना पॅन नंबर लिंक करणे आवश्यक-

तुम्ही जर LIC पॉलिसी घेतली असेल आणि तुम्हाला LIC च्या IPO मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची LIC पॉलिसी 28 फेब्रुवारी पर्यंत PAN शी लिंक करावी लागणार आहे. एलआयसीच्या शेअर बाजारातील IPO मध्ये पॉलिसीधारकांना राखीव भाग मिळाला आहे. तुम्हालाही IPO साठी अर्ज करायचा असल्यास, 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पॅनकार्ड नंबर (PAN) अपडेट करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही आरक्षित श्रेणी अंतर्गत आयपीओसाठी अर्ज करू शकता.

 Money
LIC चा अल्प उत्पन्न गटासाठी खास प्लॅन!

2. सरकारी पेन्शनधारकांना महिनाअखेर सादर करावे लागणार जीवन प्रमाणपत्र-

हा महिना निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिनाअखेर तुम्हाला एक कागदपत्र सादर करावं लागणार आहे. जर तुम्ही निवृत्तीवेतनधारक असाल आणि निवृत्ती वेतन चालू ठेवायचे असेल तर, 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तुम्ही ते सादर न केल्यास तुमची पेन्शन बंद होऊ शकते.

पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यापूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 होती, मात्र ती 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ही तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यावेळी तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास तुमची पेन्शन थांबू शकते. जीवन प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे सादर करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com