Data Theft: देशातील सर्वात मोठी डेटा चोरी; Netflix ते Paytm पर्यंत प्रत्येकाचा डेटा विक्रीला

जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात करोडो लोकांचा वैयक्तिक डेटा होता.
From Byjus to Netflix Cyberabad cops bust India's biggest data theft
From Byjus to Netflix Cyberabad cops bust India's biggest data theftSakal

India's Biggest Data Theft: हैदराबाद, तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी डेटा चोरीप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात करोडो लोकांचा वैयक्तिक डेटा होता.

या व्यक्तीला पोलिसांनी 31 मार्च रोजी सुमारे 700 दशलक्ष लोकांचा आणि कंपन्यांचा डेटा चोरून विकल्याप्रकरणी अटक केली होती. आरोपींकडून जप्त करण्यात आलेला डेटा 24 राज्ये आणि 8 मेट्रो शहरांमधील लोकांशी संबंधित आहे.

दिल्लीपासून गुजरातपर्यंत या सायबर चोराकडे क्रेडिट कार्डपासून ते लोकांच्या मार्कशीटपर्यंतचा डेटा होता. हा सर्व डेटा एका वेबसाइटवर ऑनलाइन विकला जात होता. (From Byjus to Netflix Cyberabad cops bust India's biggest data theft)

नेटवर्क हरियाणातून चालत होते :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हरियाणातील फरिदाबाद येथील InspireWebz नावाच्या वेबसाइटद्वारे लोकांचा डेटा ऑनलाइन विकत होता.

पोलिसांना आरोपींकडून बायजू आणि वेदांतूसारख्या ऑनलाइन शिक्षण आणि तंत्रज्ञान संस्थांचा डेटा मिळाला आहे. यासोबतच 24 राज्यांचा जीएसटी आणि आरटीओचा डेटाही या व्यक्तीकडून जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना आरोपींकडून संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक, सरकारी कर्मचारी, पॅनकार्डधारक, ज्येष्ठ नागरिकांसह इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे.

त्याच्याकडे दिल्लीतील वीज ग्राहक, डी-मॅट खाते, अनेक लोकांचे मोबाईल नंबर, एनईईटीच्या विद्यार्थ्यांचा डेटा, देशातील अनेक श्रीमंत व्यक्तींशी संबंधित गोपनीय माहिती, विमाधारकांचे तपशील, क्रेडिट आणि डेबिट कार्डसह भरपूर डेटा मिळाला आहे. .

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी क्लाउड ड्राईव्ह लिंकमधील डेटाबेस खरेदीदारांना विकला होता. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत, ज्यामध्ये सरकारी, खाजगी कंपन्या आणि लोकांशी संबंधित 135 गोपनीय आणि खाजगी डेटा सापडला आहे.

From Byjus to Netflix Cyberabad cops bust India's biggest data theft
WhatsApp Ban: WhatsApp ने 28 दिवसांत 45 लाखांहून अधिक खाती केली बंद; काय आहे कारण?

कोणत्या राज्यातून किती लोकांचा डेटा चोरीला गेला?

या सर्वात मोठ्या डेटा चोरीच्या राज्यनिहाय आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशातील 21.39 कोटी लोकांचा डेटा आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

यानंतर मध्य प्रदेशातील 4.50 कोटी, दिल्लीतील 2.70 कोटी, आंध्र प्रदेशातील 2.10 कोटी, राजस्थानमधील 2 कोटी आणि जम्मू-काश्मीरमधील 2 कोटी लोकांचा डेटा चोरला आहे.

From Byjus to Netflix Cyberabad cops bust India's biggest data theft
शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

या यादीमध्ये केरळमधील 1.57 कोटी, पंजाबमधील 1.5 कोटी, बिहारमधील 1 कोटी आणि हरियाणातील 1 कोटी लोकांचा डेटा समाविष्ट आहे.

डेटामध्ये म्युच्युअल फंडापासून ते सोशल मीडिया अकाउंट्सपर्यंतची माहिती चोरली आहे. आरोपींकडून Amazon, Netflix, YouTube, Paytm, PhonePe, Big Basket, BookMyShow सारख्या कंपन्यांचा डेटा जप्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com