गुगल प्ले स्टोअरवरून हटवली 11 धोकादायक अ‍ॅप, तुमच्याकडे असतील तर डिलिट करा

play store
play store

नवी दिल्ली - गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या अ‍ॅप्सपैकी अनेक अ‍ॅप धोकादायक आहेत. अशी अ‍ॅप्स आता हटवण्यास गुगलने सुरुवात केली आहे. युजर्सची फसवणूक करणारी आणि खाजगी डेटा चोरणाऱ्या अ‍ॅपवर गुगलकडून कारवाई केली जात आहे. आता गुगलने प्ले स्टोअरवरून 11 मोबाइल अ‍ॅप हटवली आहेत. ही सर्व अ‍ॅप जोकर मेलवअरने इन्फेक्टेड होती. गुगल या अ‍ॅपवर गेल्या तीन वर्षांपासून लक्ष ठेवून होतं. चेक पाँइटच्या संशधकांनी  सांगितले की, जोकर मेलवेअर या अ‍ॅप्समध्ये नव्या रुपात होता. हॅकर्स या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांच्या प्रिमियम सर्व्हिसेससाठी सबस्क्राइब करत होते..

रिपोर्टनुसार, गुगलवर बऱ्याच काळापासून ही अ‍ॅप्स होती. गूगल प्लेच्या प्रोटेक्शनपासून ते नेहमीच वाचत राहिले. मात्र आता गुगलनं त्यांच्यावर कारवाई करत प्ले स्टोअरवरून हटवलं आहे. प्ले स्टोअरवरून हटवलेल्या अ‍ॅप्सना लगेच डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने 1700 अ‍ॅपची यादी प्रसिद्ध केली होती. ती सर्व अ‍ॅप गुगलने हटवली होती. त्यामध्येही जोकर मेलवेअर आढळला होता. 

तुम्हालाही तुमच्या मोबाइलमध्ये अशी काही अ‍ॅप्स आहेत अशी शंका आली तर अ‍ॅप्स डिलिट करा. अनेक अ‍ॅप्स वापरण्यासाठी सबस्क्रिप्शन लागतं. त्यामुळे तुमचे पैसे तर गेले नाहीत ना हे चेक करा. सुरक्षित असलेली अ‍ॅप इन्स्टॉल करा. सध्या गुगलने हटवलेल्या अनेक अ‍ॅपचे APK इन्स्टॉलर शेअर केले जात आहेत. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरवर आहेत की नाही हे पाहूनच इन्स्टॉल करा.

गुगलने डिलिट केलेली अ‍ॅप
com.imagecompress.android
com.contact.withme.texts
com.hmvoice.friendsms
com.relax.relaxation.androidsms
com.cheery.message.sendsms (दोन वेगवेगळी अ‍ॅप)
com.peason.lovinglovemessage
com.file.recovefiles
com.LPlocker.lockapps
com.remindme.alram
com.training.memorygame 

गुगलने याआधी गेल्या आठवड्यातही काही अ‍ॅप हटवली होती. हटवण्यात आलेले २५ अ‍ॅप्स दोन दशलक्षपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले होते. यातील बहुतांश अ‍ॅप्स फाइल मॅनेजर्स, फ्लॅशलाइट, वॉलपेपर मॅनेजमेंट, स्क्रीनशॉट एडिटर आणि वेदर यांसारख्या सर्व्हिस देणारे होते. 

सुपर वॉलपेपर फ्लॅशलाईट ( Super Wallpapers Flashlight )
वॉलपेपर लेवल ( Wallpaper Level  )
आय वॉलपेपर  ( iwallpaper )
कॉन्ट्युअर लेवल वॉलपेपर ( Contour level wallpaper )
आयप्लेयर वॉलपेपर ( Iplayer  )
व्हिडीओ मेकर ( Video maker )
कलर वॉलपेपर ( Color Wallpapers ) 
पेडोमीटर ( Pedometer  )
पावरफुल फ्लॅशलाईट  ( Powerful Flashlight  )
सुपर ब्राईट फ्लॅशलाईट ( Super Bright Flashlight )
सुपर फ्लॅशलाईट ( Super Flashlight )
सॉलिटायर ( Solitaire )
ऍकुरेट स्कॅनिंग क्युआर कोड ( Accurate scanning of QR code )
क्लासिक कार्ड गेम ( Classic card game )
जंक फाईल क्लिनींग ( Junk file cleaning )
सिन्थेटिक  Z ( Synthetic Z )
फाईल मॅनेजर ( File Manager )
कॉम्पोझिट  ( Z Composite Z 
स्क्रिनशॉट कॅप्चर ( Screenshot capture )
डेली होरोस्कोप वॉलपेपर ( Daily Horoscope Wallpapers )
वूक्सिया रीडर ( Wuxia Reader  )
प्लस वीदर ( Plus Weather )
अ‍ॅनिम लाईव्ह वॉलपेपर ( Anime Live Wallpaper  )
आय हेल्थ स्टेप काउंटर ( iHealth step counter  )
कॉम.टाइप . फिक्शन ( Com.tyapp.fiction ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com