Hybrid VS Electric Car : Hybrid आणि Electric कोणती कार आहे बेस्टम बेस्ट!

हायब्रिड कार आणि इलेक्ट्रिक कार मध्ये काय फरक आहे
Hybrid VS Electric Car
Hybrid VS Electric Caresakal

Hybrid VS Electric Car : पेट्रोल आणि डिझेलच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे आता लोकांकडे पर्यायी इंधन किंवा Electric कारचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अशा गाड्यांकडेही लोकांचा कल वाढत आहे. लोक आता इलेक्ट्रिक कारला अधिक पसंती देत आहेत. पण यादरम्यान Hybrid कारही झपाट्याने वाढल्या आहेत.

Electric कारच्या तुलनेत Hybrid ब्रिड कार भारतात आधीपासूनच अस्तित्वात असल्या तरी फार कमी पर्यायांमुळे त्या लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकल्या नाहीत. पण आता त्यांच्याकडेही अनेक पर्याय आहेत.

अशावेळी जर तुम्हीही अशीच कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी Hybrid कार आणि इलेक्ट्रिक कार मध्ये काय फरक आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला असेल आणि कोणत्या परिस्थितीत कोणता घेणे फायदेशीर ठरेल.

Hybrid VS Electric Car
Electric Cars : इलेक्ट्रिक वाहने खरेदीच्या यादीत या देशांचा पहिला नंबर; टॉप १० मध्ये भारत आहे का?

हायब्रीड कारचे प्रकार

हायब्रीड कारचे दोन प्रकार आहेत. एक नॉर्मल आणि फुल हायब्रीड होय. या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर इंजिनला कंबाइंड पॉवर देते पण मोटारवर पूर्णपणे गाडी चालवण्याचा पर्याय नसतो. अशावेळी गाडीत पेट्रोलची नेहमीच गरज भासते.

दुसरा प्रकार म्हणजे प्लग-इन हायब्रिड, तुम्ही प्लगद्वारे या कार इलेक्ट्रिक कारप्रमाणे चार्ज करू शकता. पेट्रोल संपल्यास या गाड्या काही अंतर पार करतात उदाहरणार्थ १० ते २० किमी. तुम्ही 10 किमीपर्यंत प्रवास करू शकता. या कारचा फायदा म्हणजे त्या सामान्य हायब्रीड कारप्रमाणेही काम करतात.

Hybrid VS Electric Car
Tata Electric Cars Discount : 'या' इलेक्ट्रॉनिक कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, लगेच घ्या संधीचा फायदा

Electric Car

आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांना दहन इंजिन नसते. त्यांच्याकडे बॅटरी पॅक आणि मोटर आहे. हा बॅटरी पॅक मोटरला पॉवर देतो. मोटारीच्या रोटेशननेच गाडी चालवली जाते. पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीला पर्याय नाही.

इलेक्ट्रिक कार घेण्याचे फायदे आणि तोटे

इलेक्ट्रिक कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंधन खर्च पूर्णपणे काढून टाकणे. इलेक्ट्रिक कारमुळे थेट पेट्रोल डिझेलचा खर्च वाचतो आणि ते चार्ज करताना विजेचा खर्चही खूप कमी होतो.

इलेक्ट्रिक कारची मेंटेनन्स खूप कमी असते. बॅटरी पॅक बदलण्याचा खर्च काही लाख रुपयांपर्यंत असू शकतो, पण हा खर्च ४ ते ५ वर्षांतून एकदा येतो.

इलेक्ट्रिक कारचा सर्वात मोठा तोटा म्हणजे कमी चार्जिंग पॉईंट्स आणि त्यांची रेंजही कमी आहे. जर तुम्ही सिटी ड्राइव्हसाठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

जर तुम्ही लाँग ड्राइव्हवर गेलात तर इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी तोट्याची डील ठरू शकतात.

इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी बराच वेळ लागतो, कमीत कमी 4 ते 5 तास लागतात.

इलेक्ट्रिक कार देखील सामान्य कार आणि हायब्रिडपेक्षा खूप महाग आहेत

Hybrid VS Electric Car
Hybrid immunity काय असते ? याने बूस्टर डोजची आवश्यकता भासणार नाही! वाचा डॉक्टरांचा सल्ला

हायब्रीडचे तोटे आणि फायदे

हायब्रीड कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यांना कोणत्याही अंतरासाठी सहज पणे चालवू शकता आणि त्यांचे मायलेज सामान्य कारपेक्षा बरेच चांगले आहे.

हायब्रीड कारचे इंजिन लाइफ खूप जास्त असते.

हायब्रिड कारचा टॉर्क आणि टॉप स्पीडही चांगला आहे.

Hybrid VS Electric Car
Hybrid Solar Eclipse : शंभर वर्षानंतर जुळून आला योग, गुरुवारी दिसणार ‘हायब्रिड सूर्यग्रहण'

या गाड्यांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे मेंटेनन्स. या कार सामान्य गाड्यांपेक्षा जास्त मेंटेनन्स खर्चाची मागणी करतात.

मोटर किंवा बॅटरी मध्ये बिघाड झाल्यास हायब्रीड कार खूप महाग पडतात.

त्यांची रनिंग कॉस्ट इलेक्ट्रिक कारपेक्षा जास्त आहे. पण जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com