Hyundai Verna चा नवा अवतार बघून तुम्हीही म्हणाल क्या बात है! जबरदस्त सेफ्टी अन् अ‍ॅडवांस फिचर

या कारला दोन पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आलंय. ज्यामध्ये 1.5 लीटर नॅचरल अ‍ॅस्पायर्ड आणि 1.5 लीटर टर्बो GDi पेट्रोल इंजिनचा ऑप्शन मिळेल
Hyundai Verna
Hyundai Vernaesakal

Hyundai ने आजच त्यांची प्रसिद्ध सेडान कार Verna ची नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतात लाँच केलं आहे. याची कारची सुरुवाती किंमत 10.90 लाखापर्यंत असणार आहे. जी टॉप व्हॅरीएंसाठी 17.38 लाखापर्यंत जाऊ शकते.

या कारला दोन पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आलंय. ज्यामध्ये 1.5 लीटर नॅचरल अ‍ॅस्पायर्ड आणि 1.5 लीटर टर्बो GDi पेट्रोल इंजिनचा ऑप्शन मिळेल. कंपनीचा असा दावा आहे की या कारचे नॅचरल अ‍ॅस्पिरेटेड इंजिन 18 ते 19 किलोमीटरचा मायलेज देते. तर दुसरीकडे याचे टर्बो इंजिन जास्त पावरफूल असल्याने 20.6 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hyundai Verna
Hyundai Motors: कन्फर्म! 'या' तारखेला येतेय Hyundai ची नवी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 600KM धावणार

नव्या Hyundai Verna ने कंपनीमध्ये अनेक मोठे बदल केले आहे. जे याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत उत्तम आहेत. कंपनीने नव्या सेडान कारला फ्यूचरिस्टिक लुक आणि डिझाइन देण्याचा प्रयत्न केलाय. फ्लॅट बोनेट आणि उत्तम क्रीज लाइनसह सेडानमध्ये फ्लेयर्ड व्हील आर्क दिल्या गेले आहे. जे कारच्या साइड प्रोफाइलला मसक्यूलर लुक देतात.

Hyundai Verna मध्ये फ्री स्टँडिंग ड्युअल स्क्रीन सेटअप दिल्या गेलाय. ज्यात 10.25 इंचाचा फुल्ली डिजीटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर मिळतो, सोबतच एक सम आकाराचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिमही देण्यात आलीय.

या कारमध्ये इंटीरियला ड्युएल टोन प्रीमियम थीमने सजवण्यात आलंय. कंपनीचा असा दावा आहे की यात ड्रायव्हर सेंट्रिक कॅबिन दिल्या गेलंय आणि हे कॅबिन आधीच्या कारच्या तुलनेत ज्यास्त लेग रूम, हेड रूम आणि स्पेस देतं.

या कारमध्ये तुम्हाला 528 लीटरची बूट स्पेस मिळते जी सेगमेंटमध्ये सगळ्यात उत्कृष्ट आहे. कारमध्ये दिला गेलेला 64 कलर अँबियंट लायटिंग सिस्टिम या कारच्या इंटेरियरला आणखी सुंदर बनवते.

नव्या Hyundai Verna मध्ये कंपनीने डायमंड कट अलॉय व्हील आणि शार्क फिन एंटिना दिलाय. या कारमध्ये 2670 एमएमचा व्हीलबेस मिळतो जो खराब रस्त्यांवरही अगदी चांगला ड्रायव्हिंग एक्सपिरीयंस तुम्हाला देतो.

सेफ्टीसाठी या कारमध्ये अॅडवांस ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टिम, 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), वीएसएम, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टम, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसरही मिळतो.

Hyundai Verna
Hyundai Motors: कन्फर्म! 'या' तारखेला येतेय Hyundai ची नवी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 600KM धावणार

Hyundai Verna कंपनीने फ्रंटला LED लायटिंग दिली आहे, जी कॉर्नरकडून संपूर्ण पोर्षन कव्हर करते. कारचा फ्रंट लुक आणखी प्रीमीयम करण्यासोबतच रात्री उत्कृष्ट प्रकाशही देते. ही कार 7 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. सेडान कारसह कंपनी 3 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी देतेय. या कारच्या बुकींगलाही सुरुवात झाली आहे. (Automobile)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com