Make In India : आता स्वस्तात मस्त चीन नाही भारत! मोदींच्या नेतृत्वाखाली दिला चीनसह इतर आशियाई देशांना धोबीपछाड!

केंद्राच्या 'मेक इन इंडिया' योजने अंतर्गत देशातच उत्पादनाला चालना देण्यात येत आहे.
Make In India
Make In IndiaEsakal

भारत देश दिवसेंदिवस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये नवीन उंची गाठत आहे. एका आकडेवारीनुसार भारत आता मॅन्युफॅक्चरिंगचे ग्लोबल हब झाला आहे. दि वर्ल्ड रँकिंगने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारताने चीनसह इतर कित्येक आशियाई देशांना मागे टाकल्याचं दिसत आहे.

यापूर्वी सर्वात स्वस्त मॅन्युफॅक्चरर असलेल्या देशांमध्ये (cheapest manufacturer country) चीन आणि व्हिएतनामचा दबदबा होता. मात्र, यंदा भारताने यात बाजी मारली असून, चीनला दुसऱ्या आणि व्हिएतनामला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

Make In India
New Parliament of India : चाणाक्यांपासून ते आंबेडकरांपर्यंत नव्या संसदेतील अप्रतिम कलाकृती! सुरक्षाही चोख

हे देश आहेत टॉप 10

या यादीमध्ये (Countries with cheapest manufacturing costs) चौथ्या क्रमांकावर थायलंड, पाचव्या क्रमांकावर फिलिपाईन्स आणि त्यानंतर अनुक्रमे बांगलादेश, इंडोनेशिया, कंबोडिया, मलेशिया आणि श्रीलंका यांचा नंबर लागतो.

मेक इन इंडिया

केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेअंतर्गत देशातच उत्पादन बनवण्याला चालना देण्यात येत आहे. याचीच परिणीती म्हणून भारत सध्या जगातील सर्वात स्वस्त मॅन्युफॅक्चरर देश झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात मोबाईल, ऑटोमोबाईल अशा गोष्टी तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. आयात कमी करून देशात उत्पादन वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा परिणाम आहे.

चीनमधून बाहेर जातायत कंपन्या

गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पहायला मिळतोय. देशात वेळोवेळी होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये मोठमोठ्या कंपन्या चीनमधून पळ काढत आहेत. काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने भारतात आपलं उत्पादन सुरू केलं होतं. शिवाय, शाओमी आणि इतर कंपन्यांनी देखील भारतात आपल्या ब्रँच उघडण्यास सुरूवात केली आहे.

Make In India
COVID Alert : जगाचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाची नवीन लाट; दर आठवड्याला आढळतील साडेसहा कोटी रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com