भारताचे स्वत:चे ऍप स्टोअर येणार; गुगल आणि ऍपल जोरदार टक्कर

Indian App Store
Indian App Store

देशात प्रमुख्याने वापरले जाणाऱ्या गुगल प्ले आणि ऍपल ऍप स्टोअर्स या दोन्हींची एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी लवकरच भारत स्वत:चे ऍप स्टोअर लाँच करु शकतो. खरं तर भारतीय ऍप डेव्हलपर्स आणि उद्योजकांनी भारतीय ऍप तयार करण्याची मागणी केली आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की केंद्र सरकारद्वारे या मागणीचा विचार केला जाईल. अलिकडेच गुगलने अशा ऍप्ससाठी 30 टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. हे ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत मात्र गुगलच्या बिलिंग सिस्टीमचा उपयोग करत नाहीयत. 

इंडियन ऍप स्टोअर पहिल्यापासून अस्तित्वात
भारताचे एक ऍप स्टोअर पहिल्यापासून अस्तित्वात आहे. हे ऍप स्टोअर सध्या फक्त सरकारी ऍप्ससाठी आहे. यावर उमंग, आरोग्य सेतु आणि डिजीलॉकरसारखे ऍप्स उपलब्ध आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरवात करण्यासाठी म्हणून या ऍप स्टोअरलाच वाढवलं जाऊ शकतं. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, आपल्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरसोबतच इतरही अनेक ऍप स्टोअरदेखील पहिल्यापासून अस्तित्वात असावेत म्हणून स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यासाठी एक पॉलिसी बनवली जावी, असा विचार आहे. 

मिनिस्ट्री ऑफ इलोक्ट्रॉनिक्स आणि इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीचे (Ministry of Electronics and Information Technology) मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरील आपल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की ते भारतीय ऍप डेव्हलपर्सकडून सुचवल्या गेलेल्या या सल्ल्यावर खुश आहेत. त्यांनी म्हटलंय की आत्मनिर्भर भारत ऍप इकोसिस्टीम तयार करण्यासाठी इंडियन ऍप डेव्हलपर्सना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. 

गुगल प्ले स्टोअरने हटवले होते काही ऍप

गुगल प्ले स्टोअरने पेटीएमसहित काही ऍप्सना आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवलं होतं. गुगलने पेटीएमवर गँबलिंग म्हणजेच सट्टेबाजीस प्रोत्साहन देणारे ऍप  असं म्हणत त्याला काढून टाकलं होतं. मात्र, 24 तासाच्या आतच ते पुन्हा प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अशा घटनांमुळे भारतीय ऍप स्टोअर तयार करण्याची मागणी वाढली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com