Samvad App : व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देणार स्वदेशी 'संवाद'.. DRDOच्या सिक्युरिटी टेस्टमध्ये पास झालं अ‍ॅप! कधी होणार लाँच?

Samvad अ‍ॅपने सिक्युरिटी टेस्टमध्ये Test Assurance Level 4 क्लिअर केली आहे. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच केलं जाऊ शकतं.
Samvad App
Samvad AppeSakal

Samvad App Security Test : व्हॉट्सअ‍ॅप हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. मात्र, भारतात आता व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी थेट सरकारने स्वतःचं मेसेजिंग अ‍ॅप विकसित केलं आहे. या अ‍ॅपने नुकतीच सिक्युरिटी चाचणी पास केली आहे. 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स'ने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

Samvad अ‍ॅपने सिक्युरिटी टेस्टमध्ये Test Assurance Level 4 क्लिअर केली आहे. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच केलं जाऊ शकतं. या अ‍ॅपबद्दल खूप आधी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर बराच काळ याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. त्यामुळे कित्येक लोक याबाबत विसरून देखील गेले होते. मात्र, आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे.

Samvad App
Spy Apps : हे 12 चॅटिंग अन् न्यूज अ‍ॅप्स चोरतायत तुमचा डेटा; फोनच्या कॅमेऱ्याचाही करतायत वापर.. पाहा संपूर्ण यादी!

वेब व्हर्जन उपलब्ध

टेस्ट पास झाल्याची माहिती DRDO ने आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे. या अ‍ॅपला अद्याप लाँच करण्यात आलेलं नाही. मात्र, याचं वेब व्हर्जन अ‍ॅक्सेस करता येऊ शकतं. CDoT या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याचं वेब व्हर्जन वापरू शकता. केवळ ठराविक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. आज तकने याबाबत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला देणार टक्कर?

CDoT वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मवर वन-ऑन-वन एसएमएस, ग्रुप मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस ठेवणे, फोटो-व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट्स शेअर करणे, लोकेशन, कॉन्टॅक्ट आणि इतर डीटेल्स शेअर करण्याचा पर्यायही यात मिळेल. एक्स्टर्नल अ‍ॅप्सवर मीडिया शेअरिंग, फिल्टर्ड न्यूज, ब्रॉडकास्ट लिस्ट असे कित्येक फीचर्स यामध्ये देण्यात येतील.

Samvad App
Open AI Sora : फक्त स्क्रिप्ट एंटर करा, अन् सिनेमा होईल तयार! 'ओपन एआय'ने केलं खास व्हिडिओ बनवणारं टूल

सामान्य लोकांना या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस कधी मिळेल, किंवा हे अ‍ॅप सर्वांसाठी कधी लाँच केलं जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com