Auto Expo 2022 : ऑटो एक्सपोमध्ये धमाका करणार Kia! येतेय 'ही' दमदार 7-सीटर इलेक्ट्रिक SUV

Kia 7-Seater Electric SUV
Kia 7-Seater Electric SUV
Updated on

Kia 7-Seater Electric SUV : कोरियन ऑटोमेकर Kia ने आपल्या कॉन्सेप्ट EV9 चा टीझर रिलीज केला आहे, जी 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाऊ शकते. Kia EV9 ही एक 7-सीटर इलेक्ट्रिक SUV आहे, ज्याचे प्रॉडक्शन व्हर्जन 2023 किंवा 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट पहिल्यांदा नोव्हेंबर 2021 मध्ये एलए मोटर शो (LA Motor Show) मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ही पूर्ण आकाराची एसयूव्ही असेल, ज्याची लांबी सुमारे 5 मीटर असेल. त्याची कॉन्सेप्ट व्हर्जन 4,929 मिमी लांबी, 2,055 मिमी रुंदी आणि 1,790 मिमी उंचीची आहे.तर त्याचा व्हीलबेस 3,099mm आहे.

Kia 7-Seater Electric SUV
Auto Expo India 2023: ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट, न्यू कार लाँचिंगसह बरंच काही; पाहा संपूर्ण डिटेल्स

Kia EV9 कॉन्सेप्ट कापला ब्रँडच्या ऑपोझीट युनायटेड डिझाइन फिलॉसफीवर डिझाइन करण्यात आले आहे. हे इलेक्ट्रीक वाहन Kia च्या डिजिटल 'टायगर फेस' फ्रंट ग्रिलसह येऊ शकते, या कारला समोर नवीन एअर व्हेंट डिझाइन मिळू शकते. हूड व्हेंट डक्ट एरिया सोलर पॅनल म्हणून वापरता येतो.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

या एसयूव्हीमध्ये मागे घेता येण्याजोग्या छताचे रेल देखील मिळू शकतात, जे वापरात नसताना कॉन्सेप्ट EV9 च्या छताच्या आतून बंद करता येतात आणि आवश्यकतेनुसार, छताचे रेल बटणाच्या मदतीने परत उभे केले जाऊ शकते.

Kia 7-Seater Electric SUV
Video : शिवतारेंनंतर अजित पवार पुन्हा करणार 'करेक्ट कार्यक्रम'; विधानसभेत म्हणाले, 'मनात आणलं तर…'

गाडीमध्ये विंग मिररऐवजी कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टिम दिले जाऊ शकते. तसेच EV9 कॉन्सेप्टला 22-इंच चाके मिळू शकतात. Kia EV9 कॉन्सेप्टमध्ये एक मोठे पॅनोरामिक छत आणि 27-इंच अल्ट्रा वाइड डिस्प्ले मिळू शकतो.

SUV मध्ये पॉप-अप स्टीयरिंग पॅड देखील ऑफर केला जाऊ शकतो. Kia EV9 ही कॉन्सेप्ट मॉड्यूलर E-GMP इलेक्ट्रिक कार आर्किटेक्चरवर आधारित आहे जी Kia EV6, Hyundai Ioniq 5 आणि Ioniq 6 मध्ये देखील आढळते.

Kia 7-Seater Electric SUV
Tunisha Sharma Death Case : तुनिशाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचली शिझानची आई अन् बहिण, पाहा Video

EV6 मध्ये तुम्हाला एक मोठी लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी दिली जाऊ शकते, जी 77.4kWh असेल. कंपनीचा दावा आहे की ही ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर 483 किमी किंवा 300 मैलांपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com