
एक छोटीशी चूक अन् 'Kia'ने तब्बल ४ लाख कार बोलावल्या माघारी!
Kia recalling vehicle Airbag Issue: गाडी चालवताना अपघाताचा धोका नेहमीच असतो, त्यामुळे आजकाल अनेक कार कंपन्या आपल्या कार (Car) सुरक्षित कशा होतील यासाठी प्रयत्न करत असतात.त्याचाच एक भाग म्हणून अपघाताच्या वेळी चालक आणि प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी कारमध्ये आता अनेक एअरबॅग देण्यात येतात. त्यामुळे चालक आणि सहप्रवासी अतिशय सुरक्षित राहतात.परंतु समजा अपघाताच्या वेळी एअरबॅग उघडल्याच नाहीत तर? हाच धोका लक्षात घेत किआने तब्बल 4 लाख 10 हजार वाहने परत मागवली आहेत. अपघाताच्या वेळी सदोष एअरबॅग्ज उघडणार नाहीत या भीतीने ही वाहने (Vehicle) परत बोलावण्यात आली आहेत. (Kia is recalling 410,000 vehicles due to faulty airbags)
हेही वाचा: Kia ची इलेक्ट्रिक एसयूव्ही; एकदा चार्ज केल्यास चालेल 483 किमी
अपघातादरम्यान एअरबॅग उघडणार नाहीत याची भीती!
मोठ्या प्रमाणात रिकॉलच्या कक्षेत आलेल्या वाहनांमध्ये किआ फोर्ट कॉप्स, किआ फोर्टेस, किआ सेडोनास, किआ सोल आणि किआ सोल ईव्ही यांचा समावेश आहे. या वाहनांमधील एअरबॅग कंट्रोल युनिट सर्किट बोर्डवरील मेमरी चिपच्या संपर्कात येऊ शकते आणि इलेक्ट्रिकल सर्किटचे नुकसान करू शकते, त्यामुळे अपघातादरम्यान एअरबॅग उघडायला अडचण निर्माण होऊ शकते आणि वाहनातून प्रवास करणाऱ्यांना अपघातादरम्यान दुखापत होण्याची शक्यता वाढते. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा: Kia ची नवी कार, नवीन वर्षात होणार भारतात लाँच
सर्व प्रभावित Kia वाहनांचे मालक ते जवळच्या डीलरकडे घेऊन जाऊ शकतात आणि त्यांचे वाहन तपासू शकतात. तपासाअंतर्गत एअरबॅग कंट्रोल युनिटवर लक्ष ठेवले जाणार असून हे युनिट बदलण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम मोफत केले जाणार आहे. याशिवाय ग्राहक ३१ मार्चपर्यंत Kia च्या अधिकृत ग्राहक सेवेवर कॉल करून त्यांचे वाहन तपासण्यासाठी वेळ बुक करू शकतात.
Web Title: Kia Is Recalling 410000 Vehicles Due To Faulty Airbags
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..