आता एका क्षणात कळणार Mail करणाऱ्याचं नाव आणि लोकेशन; कसं? जाणून घ्या 

Know how to find Location and name of person who mail you
Know how to find Location and name of person who mail you

नागपूर: दिवसभरात तुम्हाला एक नव्हे १०० मेल येत असतील. तुमच्या Gmail वर येणाऱ्या मेल्सपैकी अनेक मेल जाहिरातींचे किंवा कुठल्या कंपनीचं प्रमोशन  करणारे असतात. मात्र अनेकदा एखादा महत्वाचा मेल कोणी पाठवला आहे आणि कुठून आला आहे हे आपल्याला कळू शकत नाही. याचा फायदा घेऊन ऑनलाइन गंडा घालणारे गुन्हेगारही एखादा खोटा मेल पाठवतात. अशाप्रकारचे मेल ओपन केल्यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. मात्र आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे सहजपणे तुम्हाला Gmail वर आलेला मेल कोणी पाठवला आहे? आणि त्या मेलचं लोकेशन काय? हे माहिती होणार आहे चला तर मग जाणून घेऊया. 

तुमच्या Gmail वर आलेल्या मेलचं लोकेशन काय हे जाणून घेण्यासाठी तीन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे IP Address च्या माध्यमातून लोकेशन माहिती करणे. दुसरी म्हणजे ई-मेल आयडी सर्च करणे आणि तिसरी पद्धत म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून लोकेशन जाणून घेणे. 

IP Address च्या माध्यमातून लोकेशनची माहिती

यासाठी सुरुवातीला Gmail वरचा तुम्हाला आलेला मेल ओपन करा. 
यानंतर उजव्या हाताला वेळेजवळ असलेल्या बटणवर क्लिक करा. 
यानंतर SHOW ORIGINAL वर टॅप करा. 
यानंतर तुम्हाला मेल करणाऱ्या व्यक्तीचा IP Address दिसेल. 
हा IP Address कॉपी करा आणि Wolfram Alpha ओपन करा आणि IP Address पेस्ट करा. 
इथे तुम्हाला त्या  IP Address चं लोकेशन आणि त्या कंपनीचं नाव जाणून घेता येईल. 

ई-मेल आयडी सर्च करणे 

यासाठी सुरुवातीला pipl आणि Spokio या वेबसाईट ओपन करा. 
तिथे तुम्हाला ज्या आयडीववरुन मेल आला आहे तो मेल आयडी सर्च करा. 
यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तींना मेल पाठवला आहे त्या व्यक्तीचं लोकेशन माहिती करून घेता येईल. 
या दोन्ही पद्धती पेड आहेत याचं भान असू द्या. 

फेसबुकद्वारे लोकेशन 

ज्या ई-मेल आयडीवरून तुम्हाला मेल आला आहे तो ओपन करा. 
कॉपी करून हा मेल आयडी फेसबुकवर सर्च करा. 
जर तो मेल आयडी वापरून फेसबुक अकाउंट तयार झालं असेल तर तुम्हाला त्याबद्दल सर्व काही माहिती होऊ शकेल. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com