पेट्रोल, डिझेल भरताना तुम्ही Density तपासता का? ‘अशी’ चेक करा Density नाहीतर Vehicleचं होईल नुकसान

How to check Petrol diesel density: पेट्रोल किंवा डिझेल डेंसिटीचा थेट संबध त्याच्या शुद्धतेशी आहे. सरकारने इंधनाच्या शुद्धतेसाठी डेंसिटीचे काही आकडे ठरवले आहेत. त्यानुसारच पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल देणं बंधनकारक आहे
how to check Petrol diesel density
how to check Petrol diesel densityEakal
Updated on: 

How to check Petrol diesel density: आजही अनेक पेट्रेल पंपावर ग्राहकांची फसवणूक केली जाते. पेट्रोल भरताना सावधानगिरी म्हणून अनेकजण फ्यू Fuel Dispenser डिस्पेंसर मशीनवर झिरो हा आकडा नक्की पाहतात. यामुळे पेट्रोल Petrol भरणारा काही घोळ तर घालत नाही ना याकडे लक्ष राहतं. Marathi Tips How to Check Density in Fuel on Pump

मात्र अनेकजण एक गोष्ट मात्र पाहत नाही आणि ती म्हणजे फ्यूल डेंसिटी. कदाचिर मीटरकडे दूर्लक्ष केल्यास अर्धा लिटर पेट्रोल Petrol कमी भरलं जाऊ शकतं. मात्र Fuel Density नं केलेलं दूर्लक्ष तुमच्या लाखो रुपयांच्या कारचं Car नुकसान करू शकतं. 

पेट्रोल किंवा डिझेल डेंसिटीचा थेट संबध त्याच्या शुद्धतेशी आहे. सरकारने इंधनाच्या शुद्धतेसाठी डेंसिटीचे काही आकडे ठरवले आहेत. त्यानुसारच पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल देणं बंधनकारक आहे.

भारत सरकारने पेट्रोलच्या शुद्धतेसाठी डेंसिटी ७३० ते ८०० किलोग्रॅम प्रिती क्युबिक मीटर (kg/m3) ठरवली आहे. तर डिझेलची शुद्धता डेंसिटी ही ८३० ते ९०० kg/m3 ठरवली आहे. 

तापमानाचा या डेंसिटीवर परिणाम होत असल्याने एकचा आकडा निश्चित करण्यात आला नसून यासाठी एक रेंज ठरवण्यात आली आहे.

कोणत्याही पेट्रोल पंपावर Petrol Pump ठरवलेल्या रेंजच्या खाली किंवा त्याहून जास्त डेन्सिटी असेल तर पेट्रोलमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते.

वेगवेगळ्या माध्यामाची मदत घेऊन ही भेसळ केली जाते. मात्र बऱ्याच ठिकाणी सॉल्वंट मिसळून पेट्रोलमध्ये भेसळ करण्यात आल्याच समोर आलं आहे. Check petrol density

हे देखिल वाचा-

how to check Petrol diesel density
Premium Petrol VS Normal Petrol : गाडीत कोणते पेट्रोल टाकायचे? प्रीमियम पेट्रोलचा फायदा होतो का ?

अर्थातच भेसळयुक्त पेट्रोल भरल्याने याचा थेट परिणाम तुमच्या गाडीच्या इंजिनवर आणि एकंदरच गाडीवर होणार आहे. यामुळे गाडी लवकर खराब होण्याची शक्यता असते.

आता ही भेसळ किंवा पेट्रोलची डेंसिटी कशी तपासावी असा प्रश्न तुम्हाला पडला असले. तरी आम्ही तुम्हाला पेट्रोल डेन्सिटी तपासण्याच्या काही ट्रीक्स सांगणार आहोत. How to check pure petrol

खरं तर पेट्रोलची डेंन्सिटी पंपावर डिस्प्ले करण्याचा नियम आहे. त्यामुळे पंपावरच तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या  पेट्रोलची डेन्सिटी कळू शकते. तसचं पेट्रोल भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवरही डेंन्सिटी नमूद करण्यात आलेली असते. 

डेन्सिटी चेक करण्याच्या पद्धती

फिल्टर पेपरच्या मदतीने – पेट्रोलची डेन्सिटी तपासण्यासाठी तुम्ही फिल्टर पेपरचा वापर करू शकता. फिल्टर पेपरच्या मदतीने अगदी काही मिनिटात डेन्सिटी लक्षात येते. 

यासाठी फिल्टर पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाका. यासाठी सगळ्यात आधी डिलेव्हरी नोझलचा पुढील भाग स्वच्छ करा. नोझलमधून फिल्टर पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाका. 

यानंतर २ मिनिटांमध्ये पेट्रोल फिल्टर पेपरवरून उडून जाईल. मात्र हा पेपर सुकल्यावर जर त्याच्यावर काही गडद डाग दिसले तर पेट्रोलमध्ये भेसळण्याची शक्यता असते.

या टेस्ट करण्यासाठी तुम्हाला फिल्टर पेपर खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पेट्रोल पंप संचालकाकडून हा पेपर मिळवू शकता. 

डेन्सिटी जारच्या मदतीने तपासणी

जरी फिल्टर पेपरच्या टेस्टमधून तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही डेन्सिटी जारच्या मदतीने पेट्रोलची शुद्धता तपासू शकता. यासाठी देखील तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण हा जार आणि यासाठी लागणारं इतर साहित्य पेट्रोल पंपवर उपलब्ध असतं. 

डेन्सिटी चेक करण्यासाठी तुम्हाला अर्धा लिटर इंधन जार, हायड्रोमीटर, थर्मोमीटर आणि ASTM (अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग ऑफ मटेरियल्स) कन्वर्जन चार्ज यांची आवश्यकता लागेल. हायड्रोमीटर कोणत्याही इंधनाची डेन्सिटी तपासण्याचं एक उत्तम उपकरणं आहे. 

  • या सर्व वस्तूंसाठी तुम्ही पेट्रोल पंप संचालकाकडे मागणी करू शकता.

  • वेगवेगळ्या तापमानातील घनत्व डेन्सिटी जारच्या माध्यमातून तपासता येतं. 

  • ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक ग्राहकाला पेट्रोलची शुद्धता मोजण्याचा अधिकार आहे.

  • काही वेळेस नोझलमध्ये फेरफार करून १०० मिली ते १५० मिली इंधनात फसवणूक केली जाते. 

  • शंका आल्यास तुम्ही ५ लिटर इंधनाची टेस्ट करा. पेट्रोल पंपावर ५ लिटर इंधनासाठी प्रमाणित माप उपलब्ध असतं. इथही तुम्ही इंथन योग्य प्रमाणात भरलं जातंय का हे तपासू शकता. 

अशा प्रकारे पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गेल्यावर थोड सतर्क राहणं गरजेचं आहे. फोनवर किंवा कुटुंबियांशी संवाद साधण्याएवजी. फ्यूल डिस्पेंसर तसचं डेन्सिटी योग्य आहे का हे तपासा यामुळे तुमचं नुकसान टळू शकतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com