Meta Connect 2023 : व्हीआर हेडसेट, रे-बॅन स्मार्ट ग्लासेस अन् बरंच काही.. मेटाचे हायटेक डिव्हाईसेस लाँच!

Meta AI : यावेळी मेटाने आपला नवीन एआय असिस्टंट देखील लाँच केला.
Meta Connect 2023
Meta Connect 2023eSakal

मेटाची बहुचर्चित 'मेटा कनेक्ट' परिषद सुरू झाली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी मेटाने कित्येक मोठ्या घोषणा केल्या. एआय आणि व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी या क्षेत्रात कंपनीने काही नवीन उत्पादनं देखील लाँच केली.

27 आणि 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेची सुरूवात मार्क झुकरबर्ग यांच्या भाषणाने झाली. यानंतर या कार्यक्रमात मेटाने थर्ड जनरेशन व्हीआर हेडसेट लाँच केला.

Meta Connect 2023
Meta Translator Tool : मेटाने तयार केला 'युनिवर्सल ट्रान्सलेटर'! 100हून अधिक भाषांचा अनुवाद करता येणार

मेटा क्वेस्ट 3

'Meta Quest 3' नावाचा हा व्हीआर हेडसेट दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. याच्या 128 GB व्हेरियंटची किंमत 41,552 रुपये असेल. तर 512 GB व्हेरियंटची किंमत 52,042 रुपये असणार आहे. याचं प्री-बुकिंग सुरू झालं असून, 10 ऑक्टोबरपासून हे मार्केटमध्ये उपलब्ध होईल.

रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस

रे-बॅन या प्रसिद्ध गॉगल बनवणाऱ्या कंपनीसोबत मिळून मेटाने नवीन स्मार्ट ग्लासेस बनवले आहेत. या गॉगल्सच्या माध्यमातून यूजर्स फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीम करू शकतील. सोबतच, यूजर्स केवळ व्हॉईस कमांडच्या माध्यमातून मेटा AI या एआय असिस्टंटला ऑर्डर देऊ शकतील.

या स्मार्ट ग्लासेसची किंमत सुमारे 25,000 रुपयांपासून सुरू होईल. मेटा आणि रे-बॅनच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही हे गॉगल्स मागवू शकाल. 17 ऑक्टोबरपासून हे ऑनलाईन आणि रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध होतील.

Meta Connect 2023
Mark Zuckerberg : 'व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस' यूजर्ससाठी खुशखबर! नवीन फीचर्सची घोषणा; व्यापारात होणार फायदा

मेटा एआय

मेटाने अमेरिकेत आपला नवीन एआय असिस्टंट देखील लाँच केला. Meta AI असं नाव असलेल्या हा एआय असिस्टंट व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध असणार आहे. सोबतच रे-बॅन स्मार्ट ग्लासेस आणि क्वेस्ट 3 मध्ये देखील हा असिस्टंट मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅप-इन्स्टाग्राम

व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामबाबत देखील काही घोषणा यावेळी करण्यात आल्या. व्हॉट्सअ‍ॅपवर आता एआय जनरेटेड स्टिकर्स मिळणार आहेत. म्हणजेच, तुम्ही केवळ काही शब्द टाईप केले, की त्याप्रमाणे स्टिकर तुम्हाला समोर तयार करून मिळेल.

तर, इन्स्टाग्रामवर आता फोटो एडिट करणं आणखी सोपं झालं आहे. केवळ तुम्हाला कसा फोटो हवा आहे हे टाईप करुन एआयला सांगावं लागेल. यानंतर तो फोटो आपोआप तुम्ही सांगितल्याप्रमाणे एडिट होईल.

Meta Connect 2023
WhatsApp in Android : आता 'या' अँड्रॉईड फोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; संपूर्ण यादी समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com