National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Science day
National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतात 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' (National Science Day) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. कारण 1928 मध्ये याच दिवशी प्रसिद्ध भारतीय संशोधक डॉ.सी.व्ही.रमन (C.V.Raman) यांनी याच दिवशी जगप्रसिद्ध 'रमन इफेक्ट'चा (Raman Effect) शोध लावला होता. पुढे 1930 मध्ये याच संशोधनासाठी डॉ.सी.व्ही.रमन नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा: National Science Day 2021 : का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

हेही वाचा: Photos: नोबेल विजेती मलाला अडकली विवाहबंधनात

सध्याचं आधुनिक युगात विज्ञानाला फार महत्त्व आहे. विज्ञानातील प्रगतीमुळेच लोकांचे जीवन सुकर झालं आहे. भारताने अलीकडच्या काळात लक्षणीय वैज्ञानिक प्रगती केली आहे. भारताचं मंगळयान, चांद्रयान हे याचंच द्योतक! काही दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने (ISRO) एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी पुढं येत आहेत.

हेही वाचा: HIV व्हायरसचा शोध लावणारे नोबेल विजेते संशोधक ल्यूक माँटग्नियर यांचे निधन

विज्ञान फक्त लोकांच्या सोयीसाठी उपयुक्त नाही तर त्यामुळे समाजातील अनेक अंधश्रद्धा नष्ट झाल्या आहेत. अनेक गोष्टी झपाट्याने बदलल्या. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. जग गतिमान झाले. आपण उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत आपल्याला विज्ञानाची साथ मिळाली आहे. यात अजूनही खूप करणं बाकी आहे. म्हणूनच विज्ञानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. या माध्यमातून लोकांना विज्ञानाची गोडी लागावी हा हेतू आहे.

हेही वाचा: नोबेल विजेती मलालाने केले लग्न; पती असर मलिक कोण?

राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो ?
समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य ध्येय म्हणजे देशातील विज्ञान क्षेत्रातील प्रगती अविरत कायम ठेवणे. 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' तसेच 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बहुतेक शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये विज्ञान संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय विज्ञान संस्था, विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमींमध्ये अनेक वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

टॅग्स :sciencenobel prize