नेपच्यून अनुभवतोय चक्क Climate Change; काय असावे कारण ?

खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यूनवरील जागतिक तापमानात आश्चर्यकारक बदल अनुभवले
Evolution of Neptune's tempreture over the last decades
Evolution of Neptune's tempreture over the last decadessakal

गेल्या १७ वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञ नेपच्यून ग्रहाला (Neptune) दुर्बिणीने पाहतात. नेपच्यूनचे निरीक्षण करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यूनवरील जागतिक तापमानात आश्चर्यकारक बदल अनुभवले. याकरिता मनुष्य जबाबदार नाही,हे तितकेच खरे आहे मात्र यामागे काय कारण असावे,हे अद्याप एक गुढ आहे. (Over the last 17 years, Neptune has experienced quite a dramatic climate change)

Evolution of Neptune's tempreture over the last decades
Data Theft: तुमचा वैयक्तिक डेटा विकून कंपन्या कमवताहेत पैसे; सरकार घालणार लगाम

सूर्याभोवती ४.५ अब्ज किलोमीटर प्रदक्षिणा घालणारा नेपच्यून पृथ्वीप्रमाणेच ऋतू अनुभवतो मात्र एखादा ऋतू नेपच्यूनवर जास्त काळ टिकतो. नेपच्यूनवरील एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरील 165 वर्षे म्हणजेच एकच ऋतू नेपच्यूनवर सुमारे 40 वर्षे टिकू शकतो. 2005 पासून नेपच्यूनच्या दक्षिण गोलार्धात उन्हाळा सुरू झालेला दिसून आला होता.

Evolution of Neptune's tempreture over the last decades
Data Theft: तुमचा वैयक्तिक डेटा विकून कंपन्या कमवताहेत पैसे; सरकार घालणार लगाम

खगोलशास्त्रज्ञांनी (Astronomers) 2005 वर्षी दक्षिणेकडील ग्रहाच्या वातावरणातील तापमानाचा मागोवा घेण्याचे ठरवले. तेव्हापासून घेतलेल्या नेपच्यूनच्या प्रतिमांमध्ये नेपच्यूनचा बराचसा भाग 2003 आणि 2018 दरम्यान 8 अंश सेल्सिअसने हळूहळू थंड होत गेला.

Evolution of Neptune's tempreture over the last decades
Data Theft: तुमचा वैयक्तिक डेटा विकून कंपन्या कमवताहेत पैसे; सरकार घालणार लगाम

प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या लेखात असे म्हटले की हा बदल अनपेक्षित होता. आम्ही नेपच्यूनचे दक्षिणेकडील उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात निरीक्षण करत असल्याने, तापमान थंड नसून हळूहळू उष्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा होती.मात्र तसे झाले नाही. (Neptune’s global temperature is doing something unexpected.)

नेपच्यूनसंदर्भातअधिक संभ्रम वाढत असून नेपच्यूनवर सातत्याने वातावरणात बदल दिसून येतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com