OnePlus 10 Pro लवकरत भारतात होणार लॉंच; परवडणारा 5G फोनही मिळणार

oneplus 10 pro
oneplus 10 pro

OnePlus 10 Pro स्मार्टफोन भारतासह इतर जागतिक बाजारपेठेत या महिन्याच्या अखेरीस लॉन्च केला जाईल. कंपनीने सोमवारी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC) याची घोषणा केली. OnePlus ने हे देखील उघड केले आहे की, कंपनी भारत आणि युरोपमध्ये त्यांचा सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन आणि नवीन IoT डिव्हाइसेस लॉन्च करण्यात येतील. कंपनी 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनवर देखील काम करत आहे.

भारतात लॉन्च होणार परवडणारा 5G फोन

OnePlus च्या मते, OnePlus 10 Pro स्मार्टफोनची विक्री भारत, युरोप आणि उत्तर अमेरिकेत या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. कंपनीने सांगितले की या स्मार्टफोनने चीनमध्ये रिटेल सेल दरम्यान CNY 100 मिलीयन (सुमारे 120 कोटी रुपये) पेक्षा जास्त कमाई केली आहे. OnePlus 10 Pro चीनमध्ये जानेवारीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. OnePlus ने म्हटले आहे की, ते या वर्षाच्या शेवटी भारत आणि युरोपमध्ये आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करेल. कंपनीने सांगितले की, ते भारतात रिटेल मॉडेल देखील आणणार आहेत. हा फोन ऑनलाइन ऑर्डर करता येईल, परंतु तो घेण्यासाठी ग्राहकांना रिटेल दुकानात जावे लागेल, जिथे स्टोअर मेंबर फोनचे सेटअप करुन देईल.

फास्ट चार्जिंग स्मार्टफोनही होणार लॉन्च

OnePlus ने सांगितले आहे की, ते या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हा स्मार्टफोन 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे तंत्रज्ञान Oppo संशोधन संस्थेने विकसित केले आहे. असा दावा केला जातो की ते 4,500mAh बॅटरी 5 मिनिटांत 1 टक्क्यांवरून 50 टक्के चार्ज करू शकतो.

oneplus 10 pro
बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

OxygenOS हे स्वतंत्र प्रॉपर्टी राहील

OnePlus ने सांगितले की, जेव्हा Android 13 येईल तेव्हा त्याचा OxygenOS 13 एक स्वतंत्र ब्रँड मालमत्ता राहील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, OnePlus उपकरणांवर OxygenOS कायम ठेवण्याचा निर्णय ग्रुपकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर घेण्यात आला आहे. मात्र, आधी घोषित केल्याप्रमाणे ऑक्सिजनओएस आणि कलरओएस दोन्ही समान कोडबेसवर विकसित केले जातील.

oneplus 10 pro
LPG Price : LPG सिलिंडर आजपासून महाग, द्यावे लागणार 105 रुपये जास्त

OnePlus चा सिस्टर-ब्रँड Oppo ने 150W SuperVOOC चार्जिंग तंत्रज्ञान देखील सादर केले. हे तंत्रज्ञान आगामी Oppo फ्लॅगशिप फोनमध्ये आणण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने 240W SuperVOOC फ्लॅश चार्ज तंत्रज्ञानाचा डेमो देखील यावेळी दिला.. ओप्पोचा दावा आहे की या तंत्रज्ञानामुळे 4,500mAh बॅटरी 1 टक्के ते 100 टक्के सुमारे 9 मिनिटांत चार्ज करता येईल. मात्र, कंपनीने हे सांगितले नाही की 240W चार्जिंग तंत्रज्ञान कधी आणि कोणत्या डिव्हाइसमध्ये दिले जाईल.

oneplus 10 pro
तरुणाच्या हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, दुसरीकडे भावाकडून भावाची हत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com