ट्विटरचं ओपन चॅलेंज; चूका शोधा आणि जिंका 3,500 डॉलर

 twitter
twitter

Twitter Bias Bounty Challenge: माइक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) ने एका नव्या स्पर्धेची घोषणा केली आहे. ज्यात ट्विटरच्या ऑटो इमेज क्रॉप (Automatic Image Crops) अल्गोरिदममध्ये त्रुटी शोधून काढल्यास 3,500 डॉलरपर्यंत घसघशीत बक्षिसं मिळू शकतात.

या स्पर्धेत जिंकणाऱ्या टीम्सना हॅकरवन (HackerOne) कडून कॅश प्राइजेस मिळतील. पहिल्या क्रमांकासाठी 3,500 डॉलर्स, दूसऱ्या क्रमांकासाठी 1000 डॉलर्स, तिसऱ्या क्रमांकासाठी 500 डॉलर आणि सगळ्यात इनोव्हेटिव टिमसाठी 1000 डॉलर्सची बक्षिसं दिली जातील.

 twitter
सविता पुनिया: इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघाची 'नवी वॉल'

ट्विटरच्या अल्गोरिदममध्ये काढा त्रुटी आणि जिंका घसघशीत बक्षिसं

मे महिन्यात आम्ही आमच्या सॅलियंसी अल्गोरिदम (saliency algorithm) ज्याला इमेज क्रॉपिंग अल्गोरिदम (image cropping algorithm) ही म्हटले जाते, त्यातील त्रुटी शोधण्यासाठी कोड उपलब्ध केल्याची ब्लॉग पोस्ट ट्विटरमधील सॉफ्टवेअर इंजीनियरिंग डायरेक्टर रुम्मन चौधरी (Rumman Chowdhury) यांनी केली होती.

आम्ही या Algorithm मधून भविष्यात होणाऱ्या चुकांचा शोध घेणाऱ्या लोकांना आमंत्रित करत आहोत. ज्या चुका आम्ही आतापर्यंत शोधू शकलो नाहीत, त्यामुळेच अशा चुका शोधल्यास आम्ही बक्षिसे देणार आहोत असेही चौधरी म्हणाले.

 twitter
Olympics : भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

या स्पर्धेमागचे ट्विटरचे महत्त्वाचे उद्दिष्ट
रिसर्च आणि हॅकर्सनी सुरक्षा क्षेत्राशी निगडीत त्रुटी शोधून त्या कमी करण्यासाठी मदत केली आहे, त्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आम्ही अशा सोसायटीचा निर्माण करु इच्छितो जी नैतिकतेचे पालन करत आम्हाला मोठ्या आणि महत्त्वाच्या समस्यांची ओळख करुन देण्यास मदत करेल असेही ट्विटरमधील सॉफ्टवेअर इंजीनियरिंग डायरेक्टर रुम्मन चौधरी (Rumman Chowdhury) म्हणाले.

या स्पर्धेतून आमचे महत्त्वाचे उद्दीष्ट हे केवळ Twitter आणि या इंडस्ट्रीमधील अल्गोरिदमशी निगडीत त्रुटी कमी करणे आणि एक चांगले उदाहरण सेट करणे आहे असंही चौधरी म्हणाले.

ट्विटर आपल्या सॅलियंसी अल्गोरिदम (saliency algorithm) आणि यात वापरल्या गेलेल्या कोडला शेअर करत आहेत, स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना या को़च्या मदतीने अल्गोरिदममधील त्रुटी शोधायच्या आहेत.

 twitter
आखाडची जोरदारी तयारी; चिकन, मटणाच्या मागणीमध्ये वाढ

8 ऑगस्टला होणार विजेत्यांची घोषणा
विजयी टीम्सची पारख परिमाणात्मक आणि गुणात्मक (quantitative and qualitative) या मुद्द्यांवर होईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना सबमिशन करण्यासाठी हॅकरवनमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी हॅकरवनमध्ये रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.

विजेत्यांची घोषणा 8 ऑगस्टला ट्विटरद्वारे आयोजित DEF CON AI Village वर्कशॉपमध्ये केली जाईल. जिथे विजेते त्यांनी शोधलेल्या चुका आणि आपले कामही दाखवू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com