WhatsApp चा मोठा प्लॅन, यूजर्सला मोजावे लागेल या फिचरसाठी पैसे

व्हाट्सॲपने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर मल्टी-डिव्हाइस फिचर्स आणले आहेत. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे अकाउंट अनेक डिवाइसवर वापरु शकता.
WhatsApp's Paid Features News, WhatsApp Multidevice Login Feature News
WhatsApp's Paid Features News, WhatsApp Multidevice Login Feature News sakal

व्हाट्सॲप हा दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ख्याती असलेले व्हाट्सॲपचे सुमारे 200 दशलक्ष वापरकर्ते आहेत. व्हाट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असतो. व्हाट्सॲपने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर मल्टी-डिव्हाइस फिचर्स आणले आहेत. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे अकाउंट अनेक डिवाइसवर वापरु शकता. आता व्हॉट्सॲप या फिचर्सचा विस्तार करण्याचा प्लॅन करत आहे. या प्लॅननुसार व्हॉट्सॲप चारपेक्षा जास्त डिव्हाइसवर एकच खाते वापरण्यास सक्षम असणार. (WhatsApp's Paid Features)

व्हॉट्सॲप एका फिचर्सची टेस्टींग करत आहे जे युजर्सला चारपेक्षा जास्त डिव्हाइसवर आपले अकाउंट वापरण्याची परवानगी देईल. सध्या,युजर्स एकाच वेळी टॅबलेट, संगणक/लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर एकच खाते वापरू शकतात.

WhatsApp's Paid Features News, WhatsApp Multidevice Login Feature News
फक्त 2599 रुपयांत खरेदी करा स्मार्टफोन, जिंका खास ऑफर्स!

व्हॉट्सॲपचा प्लॅन काय आहे?

व्हॉट्सॲप सबस्क्रिप्शन-आधारित या प्लॅनवर काम करत आहे, जे विशेषतः व्हॉट्सॲप बिझिनेस युजर्ससाठी असेल. व्हॉट्सॲप डिव्हाइसेस लिंक करण्यासाठी एक नवीन इंटरफेस तयार करत आहे.

व्हॉट्सॲप सुधारित इंटरफेसमध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्टसाठी पूर्णपणे वेगळा प्लॅन करत आहे, याद्वारे युजर्स एकाधिक डिव्हाइसवर आपली अकाउंट वापरू शकेल. यामुळे विविध लोक एकाच वेळी ग्राहकांशी व्यवसाय खात्यांद्वारे बोलू शकणार

WhatsApp's Paid Features News, WhatsApp Multidevice Login Feature News
मारुती सुझुकीची नवीन XL6 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत-फीचर्स

अतिरिक्त फिचर्स मिळतील

हा सबस्क्रिप्शन प्लॅन WhatsApp बिझिनेस अकाउंटसाठी असतील आणि सदस्यत्व घेतलेल्या युजर्सला बिझिनेससाठी अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळतील. सध्या, युजर्स एकाच वेळी चार डिव्हाइसेसवर एक अकाउंट वापरू शकतात, परंतु या सबस्क्रिप्शन प्लॅननंतर, वापरकर्ते 10 डिव्हाइसेसवर एक खाते वापरण्यास सक्षम असतील.

सामान्य वापरकर्त्यांसाठी ॲपमध्ये कोणताही बदल होणार नाही सबस्क्रिप्शन प्लॅन पूर्णपणे पर्यायी असेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com