PUBG लव्हर्ससाठी खुशखबर; भारतात होणार लवकरच कमबॅक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PUBG

PUBG Mobile बॅन करण्याआधी भारतात जवळपास 50 दशलक्ष इतके ऍक्टीव्ह यूझर्स होते.

PUBG लव्हर्ससाठी खुशखबर; भारतात होणार लवकरच कमबॅक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत-चीन या दोन्ही देशांत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अनेक चीनी ऍप्सवर भारतात बंदी आणली होती. यातीलच भारतातील एक लोकप्रिय गेम ऍप म्हणजे PUBG होय. भारतातील बहुतांश तरुणाईला या गेम ऍपने भुरळ पाडली होती. PUBG Mobile बॅन करण्याआधी भारतात जवळपास 50 दशलक्ष इतके ऍक्टीव्ह यूझर्स होते. PUBG Mobile साठी भारत हे सर्वांत मोठे मार्केट होते यात शंका नाही. मात्र, त्यावर अचानक बंदी आणली गेल्याने अनेकांना दु:ख झालं होतं. मात्र, आता PUBG पुन्हा एकदा परत येणार असल्याची बातमी आहे. 

हेही वाचा - Corona Update : शुक्रवारी नवे 50,314 रुग्ण; एकूण मृतांचा आकडा 1.25 लाखांच्या पार

भारताने चीनलाच रणनीतींद्वारे कोंडीत पकडण्यासाठी चीनचे अनेक ऍप बंद केले होते. चीनी कंपनी Tencent ला भारतातील सर्व्हर बंद करावे लागले होते. त्यामुळे, हा गेम भारतातल्या युझर्सना खेळता येत नव्हता. मात्र, एका रिपोर्टनुसार PUBG Mobile हा खेळ पुन्हा एकदा भारतात दाखल होऊ शकतो. टेक क्रंचच्या सांगण्यानुसार, दोन सुत्रांनी ही माहीती दिली आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा PUBG Mobile भारतात परतू शकतो. रिपोर्टनुसार, PUBG Mobile ही मुळची कोरीयन कंपनी आहे. ती सध्या जागतिक क्लाऊड सर्व्हीस प्रोव्हायडरची चर्चा करत आहे. या चर्चेनुसार, ही कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडरशी स्थानिक पातळीवर चर्चा करत असून स्थानिक डेटा इथेच स्टोअर करण्याबाबत ही चर्चा होत आहे. मात्र, कोणत्या कंपनीशी याबाबत चर्चा होत आहे, ही माहीती अद्याप समजलेली नाहीये.

हेही वाचा - ​Bihar Election : 'नवा रेकॉर्ड बनवा'; बिहारच्या जनतेला PM मोदींचं आवाहन

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, PUBG Mobile कंपनीने भारताच्या हाय प्रोफाईल स्ट्रीमर्सना याबाबतची तयारी करण्यास सांगितले आहे. यानुसार, या वर्षाच्या अखेरीपर्यंत PUBG Mobile पुन्हा एकदा परत येण्याची शक्यता आहे. मात्र, PUBG Mobile ने याबाबतचे ऑफिशियल स्टेटमेंट दिेलेले नाहीये. मात्र, अपेक्षा आहे की, या महिन्याच्या शेवटी दिवाळीच्या दरम्यान PUBG Mobile भारतात पुन्हा येऊ शकतो.

PUBG Mobile ही मूळची कोरीयन कंपनी आहे. आधी Bluehole म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आता Krafton नावाने ओळखली जाते. या कंपनीने आपला करार Tencent शी तोडला आहे. याचं कारण अर्थातच धोरणात्मक आहे. ही चीनी कंपनी भारतीयांचा डेटा चोरू शकते, अशी भीती असल्यानेच भारत सरकारने या ऍपवर बंदी घातली होती. मात्र, इतर देशांसाठी Tencent या कंपनीकडेच PUBG Mobile चे अधिकार आहेत. 

loading image
go to top