पुरुष आणि महिलांचा मेंदू भिन्न पद्धतीने काम करतो; संशोधकांचा दावा

पुरुष आणि महिलांचा मेंदू भिन्न पद्धतीने काम करतो असा दावा संशोधकांनी केला आहे.
brains of men and women work differently
brains of men and women work differentlyEsakal

स्त्री (Women)आणि पुरुष (Men) यांचे मन पूर्णपणे भिन्न प्रकारे कार्य करते, असं आपण अनेकदा ऐकलं असेल. परंतु आपण ते गांभीर्याने घेत नाही. पण या गोष्टीची पुष्टी करणारा एक नवा अभ्यास समोर आला आहे. या अभ्यासात अशी 1,000 जनुके (Genes) आढळून आली जी एका लिंगात दुसऱ्यापेक्षा जास्त सक्रिय असतात. (Researchers claim that the brains of men and women work differently.)

अभ्यासादरम्यान, शास्त्रज्ञांनी मादी उंदरांचा त्यांच्या एस्ट्रस सायकल आणि नर उंदरांच्या (Rat) वेगवेगळ्या टप्प्यांचा अभ्यास केला. पुरुष आणि महिलांचा मेंदू भिन्न पद्धतीने काम करतो असा दावा संशोधकांनी (Scientist) केला आहे. स्टॅनफोर्ड मेडिसिनच्या (Stanford Medicine) संशोधकांनी सांगितले की हे फरक पुरुष आणि स्त्रियांच्या मेंदूमध्ये देखील दिसून येतात.

brains of men and women work differently
स्त्री-पुरुष संबंधांचा वैद्यकीयदृष्ट्या विचार

शास्त्रज्ञांनी लिंग जनुकांमधील (Sex Genes) फरक शोधण्यासाठी मेंदूच्या (Brain)चार वेगवेगळ्या भागांचे परीक्षण केले. या मेंदूच्या संरचनेतून काढलेल्या ऊतींचे विश्लेषण करताना, शास्त्रज्ञांना 1,000 हून अधिक जनुकं आढळली, जी एका लिंगाच्या मेंदूमध्ये दुसर्‍या लिंगापेक्षा लक्षणीयपणे अधिक सक्रिय होते.या जनुकांचा प्रारंभ बिंदू म्हणून वापर करून, आम्ही मेंदूच्या पेशींचे विशिष्ट गट ओळखले आहेत, जे विशिष्ट लिंग-विशिष्ट वर्तनांचे आयोजन करतात, असे मानसोपचार, वर्तणूक विज्ञान आणि न्यूरोबायोलॉजीचे (Neurobiology) प्राध्यापक नीरव शाह म्हणाले.

brains of men and women work differently
प्रेम असूनही लग्न करण्यास ४ सवयीमुळे नकार देतात पुरुष

लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये लिंग-विशिष्ट सामाजिक वर्तन प्राण्यांच्या मेंदूमध्ये तयार केले गेले आहे, असे ते म्हणाले. उदाहरणार्थ, नर उंदीर घुसखोर नरावर लगेच हल्ला करतात. जर ती स्त्री असेल तर त्या प्रेमसंबंध सुरू करतात.मादी उंदीर आक्रमकतेऐवजी मातृत्व दाखवतात, अर्भकांना धोका असलेल्या कोणत्याही गोष्टीवर हल्ला करतात. त्यांची संभोग करण्याची इच्छा त्यांच्या सायकलच्या टप्प्यावर अवलंबून असते. शहा म्हणाले, ही मूलभूत वर्तणूक जगण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक आहे आणि ती मोठ्या प्रमाणात उपजत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com