Rolls Royals : रोल्स रॉयस गाडी बनवण्यासाठी बैलाची कातडी कशी वापरली जाते?

भारतातल्या एका महाराजांनी रोल्स रॉईस गाड्या कचरा उचलायला ठेवली होत्या
Rolls Royals
Rolls Royalsesakal
Updated on

रोल्स रॉईस नाम ही काफी है!... या गाडीच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. रोल्स रॉईस ही गाडी सामान्य माणूस केवळ स्वप्नात चालवू शकतो. कारण तिला खरेदी करणं आणि मेंटेन करणं परवडणारं नाही. आज या गाडीबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.

रोल्स रॉईस गाडीचे आणि भारताचे एक वेगळे नाते आहे. राजा-महाराजांच्या काळात ही गाडी भारतातील प्रत्येक राजाकडे असायची. एकदा एक महाराज ती गाडी खरेदी करायला गेले तर शोरूमच्या सेवकाने त्यांच्या साध्या राहणीमानावरून अपमान केला. त्यावर चिडून राजांनी सात रोल्स रॉईस खरेदी केल्या, त्या भारतात आणल्या आणि कचरा उचलायला ठेवल्या. पून्हा त्या कंपनीने माफी मागितली तेव्हा ते प्रकरणं निवळलं.

Rolls Royals
Flying Race Car : आता आकाशात होणार फॉर्म्युला वन रेसिंग; जाणून घ्या सर्वकाही

रोल्स रॉयस कारमध्ये असे काय होते की ते इतके खास बनवते हे तुम्हाला माहिती आहे का? बाजारात अनेक महागड्या गाड्या आहेत, परंतु रोल्स रॉयसची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे कारण जेव्हा ती रस्त्यावर धावते तेव्हा लोक फक्त तिच्याकडे पाहत असतात.

आज या कंपनीची स्थापना झाली होती. हेन्री रॉयस आणि चार्ल्स रोल्स यांनी मिळून 1904 मध्ये रोल्स रॉइस कंपनीची स्थापना केली. त्यानंतर 1980 मध्ये ब्रिटीश डिफेन्स कंपनी व्हीकर्सने रोल्स-रॉईस कंपनी विकत घेतली. प्रत्येकाचे स्वप्न असलेली रोल्स रॉईस ही गाडी बनवण्यासाठी बैलाच्या कातडीचा वापर केला जातो हे तूम्हाला माहिती आहे का? त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

Rolls Royals
SUV Car Price : अबब ! या आलिशान SUV ची किंमत आहे 7 लाखांपेक्षा सुद्धा कमी..
रोल्स रॉईसचे राजेशाही मॉडेल
रोल्स रॉईसचे राजेशाही मॉडेलesakal

या गाडीचे रेडीयेटर ग्रिल मशीनच्या साहाय्याने बनत नाही. तर ते चक्क हाताने बनवलेले असते. हे रेडीयेटर ग्रील बनवायला एक संपूर्ण दिवस लागतो व ते पॉलीश होण्यासाठी, जवळपास पाच तास लागतात.

दोन रोल्स रॉयसची रेडीयेटर ग्रील्स एकसारखी असत नाहीत. तरीही त्यांची कार्यक्षमता अगदीच योग्य असते. सध्याची रोल्स रॉयस म्हणजे उत्कृष्ट जर्मन इंजिनियरिंग आणि ब्रिटीश सोफिस्टीकेशन यांचे उत्तम मिश्रण आहे.

Rolls Royals
Top 10 Selling Cars : कार घेताना कोणती घ्यावी? यावर चर्चा पुरे झाली, ही कार ठरली नंबर 1

अगदी साडेसहा फूट उंची असलेली व्यक्ती सुद्धा मागच्या सीटवर आरामात ऐसपैस बसू शकते. इतकी लेग स्पेस इतर गाड्यांत बघायला मिळत नाही.

रोल्स रॉयस ही एक हाय परफॉर्मन्स गाडी आहे. या गाडीच्या इंजिनचा अजिबात आवाज होत नाही. ही गाडी सायलेंट, एफर्टलेस आणि क्वाएट म्हणून प्रसिद्ध आहे.

Rolls Royals
SAKAL Special : Child Car मुळे तरुणांना रोजगार; खेळणीतील कारमधून शोधले उत्पन्नाचे साधन!

गाडी बनवण्याच्या प्रोसेस प्रक्रियेपासून, ते गाडीत वापरण्यात आलेल्या लेदरपर्यंत सर्व साहित्य हे सर्वोत्तम दर्जाचे असते. लेदरसाठी बावेरियन प्रदेशातील उत्तम प्रतीच्या बैलांची कातडी वापरली जाते.

गाईच्या कातडीवर स्ट्रेच मार्क्स असतात. म्हणून फक्त बैलाचीच कातडी वापरली जाते. प्रदेशात बैलांच्या अंगावर किडे नसतात किंवा किड्यांच्या चावण्याचे व्रण नसतात. म्हणून त्याच बैलांच्या कातडीचा उपयोग करतात.

Rolls Royals
Best Cars : भारतातल्या 5 बेस्ट कार, ज्यांनी जिंकलाय लोकांचा विश्वास; वाचा भन्नाट फिचर्स

ज्या बैलांची कातडी वापरतात त्यांचे मांस खाटिकखान्यात विकतात. जेव्हा सीटसाठी लेदर वापरून उरते तेव्हा ते पर्सेस, घड्याळे, वॉलेट्स बनवण्यासाठी वापरण्यात येते. काहीही वाया जाऊ देत नाहीत.

रोल्स रॉईस कार
रोल्स रॉईस कारesakal
Rolls Royals
Tata Upcoming Cars : शानदार व्हॅरिएंटमध्ये येतेय टाटाची ही नवी कार, जाणून घ्या खासियत

तसेच या गाड्यांचे वुडन फिनिशिंग सुद्धा अगदी उत्तम प्रकारचे असते. या गाडीचे वुडन वर्क करण्यासाठी माणसे शब्दश: भिंग घेऊन काम करतात. अगदी बारीकशीही त्रुटी राहू नये म्हणून व प्रत्येक लाकडी पार्ट परफेक्ट बसावा यासाठी तपशीलवार काम केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com