भन्नाटच! सॅमसंगनं आणला 2-इन-1 लॅपटॉप; फोल्ड करताच होईल टॅबमध्ये रूपांतर; जाणून घ्या फिचर 

Samsung lntroduce foldable Galaxy Book Flex 2 5G foldable laptop
Samsung lntroduce foldable Galaxy Book Flex 2 5G foldable laptop

नागपूर: सॅमसंग कंपनी नेहमीच आपल्या नवनवीन स्मार्टफोन्स आणि गॅजेट्समुळे यूजर्सना आकर्षित करत असते. स्मार्टफोन्स आणि त्यांचे फीचर्स अगदी हटके असतात. विशेष म्हणजे सॅमसंगचे हे काही गॅजेट्स सर्वसामान्यांना परवडेल असाच किमतीत असतात त्यामुळे अनेकजण सॅमसंगची निवड करतात. मात्र आता तुम्हाला लॅपटॉप आणि टॅब या दोन्ही एकाच गॅजेटमध्ये मिळालं तर? हो सॅमसंगनंच्या लॅपटॉपची बनावट याच प्रकारची आहे. हा लॅपटॉप क्षणांत टॅबसारखा वापरता येऊ शकणार आहे.  चला तर मग जाणून घेऊया या लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशनबद्दल. 

सॅमसंग कंपनीनं या Galaxy Book Flex 2 5G लॅपटॉपचा एक व्हिडीओ नुकताच लाँच केला आहे. या 2-इन-1 लॅपटॉपमध्ये 5G सपोर्टसह 13 MP कॅमेराही देण्यात आला आहे. तसंच हा लॅपटॉप फोल्ड करताच तुम्हाला टॅबसारखा वापरता येणार आहे. त्यामुळे सॅमसंगच्या या लॅपटॉपची बाजारात चांगलीच चर्चा सुरु आहे. 

काय आहेत लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स 

हा लॅपटॉप फोल्डिंग मेकॅनिझमसह येणार आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्ही 360 डिग्रीपर्यंत फिरवू शकणार आहात. म्हणूनच तुंही या लॅपटॉपला टॅबसारखं वापरू शकणार आहात. तसंच यामध्ये 13.3 इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेषश म्हणजे यांमध्ये तुम्ही S-Pen चा सुद्धा वापर करू शकणार आहात. त्याला ठेवण्यासाठी यात एक वेगळा स्लॉट देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 11th gen Intel Core प्रोसेसर तसंच16 जीबी RAM देण्यात आली आहे. 

लॅपटॉपमध्ये 13MP कॅमेरा 

या लॅपटॉपमध्ये इतर स्मार्टफोनसारखाच 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही यात HD व्हिडीओ कॅल्लिंग करू शकणार आहात. तसंच यात फिंगर प्रिंट रीडर देण्यात आलं आहे. 

किती आहे किंमत?

या सॅमसंगच्या लॅपटॉपची किंमत तब्बल 27.25 लाख दक्षिण कोरियाई वॉन (KRW) म्हणजेच जवळपास 1.82 लाख रुपये इतकी आहे.   

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com