पुढच्या महिन्यात लॉंच होतायत 'हे' दमदार स्मार्टफोन; पाहा यादी

Redmi K50 Pro +
Redmi K50 Pro +google

Smartphones launching in December 2021 : येत्या काही दिवसात नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर कोणता स्मार्टफोन घ्यावा या बद्दल तुमच्या मनात बराच गोंधळ होण्याची शक्यता असते. बाजारात अनेक ऑफरसह, तुमच्यासाठी शेकडो स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. दरम्यान डिसेंबर महिन्यात अनेक दमदार स्मार्टफोन्स लॉंच होत आहेत, जर तुम्ही लेटेस्ट स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर येत्या महिन्यात लॉंच होणाऱ्या काही स्मार्टफोन ऑप्शन्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. OnePlus, Realme, Redmi, iQOO आणि असे बरेच मोठे स्मार्टफोन ब्रॅंड डिसेंबर महिन्यात नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. चला तर मग या लेटेस्ट स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

OnePlus RT

OnePlus 9RT च्या भारतीय व्हर्जनचे नाव OnePlus RT असण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन अलीकडेच चीनमध्ये लाँच करण्यात आला आणि त्यात स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आणि 6.62" फ्लुइड AMOLED डिस्प्ले यांसारखी फ्लॅगशिप फीचर्स देण्यात आली आहेत. डिव्हाइस ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअपसह लॉंच केला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला 50MP प्रायमरी कॅमेरा सोबत 16-मेगापिक्सेल दुसरा कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल तिसरा सेन्सर मायक्रो फोटोग्राफीसाठी देण्यात येईल.

या सोबतच फ्रंटला एक 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील अपेक्षित आहे जो वरच्याबाजूला देण्यात आलेल्या-डाव्या बाजूच्या पंच-होलमध्ये दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये मोठी 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. काही लीक्सनुसार, OnePlus RT भारतात 16 डिसेंबर रोजी लॉन्च होऊ शकतो.

Redmi K50 Pro +
बजेटमध्ये बसणारी इलेक्ट्रिक बाइक शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

Redmi K50 series

Redmi K50 सीरीजमध्ये व्हॅनिला Redmi K50, Redmi K50 Pro आणि टॉप-एंड Redmi K50 Pro+ यांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. Redmi K50 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ रिझोल्यूशन डिस्प्लेसह 6.28-इंचाचा OLED डिस्प्ले दिलेला असेल. डिस्प्ले 2.5D वक्र टेम्पर्ड ग्लासद्वारे , सुरक्षित केला जाईल आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे लेटेस्ट व्हर्जन या फोन्समध्ये वापरण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 SoC सपोर्ट मिळणार आहे. हे स्मार्टफोन्स 64, 128 आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसह 6, 8, आणि 12 GB रॅममध्ये उपलब्ध असेल.

Redmi K50 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेट 12 GB RAM दिलेली आहे. यात 6.69-इंचाचा डिस्प्ले असून मागील बाजूस 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर असणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असेल आणि यामध्ये बॅटरी 4,500 mAh असेल.

Redmi K50 सीरीडमध्ये सर्वात शक्तिशाली व्हेरियंट Redmi K50 Pro+ च्या मागील बाजूस 108-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह इमर्सिव्ह 6.69 इंच AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. K50 Pro+ 6GB RAM सह Qualcomm Snapdragon 888 SoC दिले जाईल. यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5000 mAh बॅटरी मिळणार आहे.

Redmi K50 Pro +
फ्लिपकार्टचा Black Friday सेल; iPhone 12 वर आहे बंपर डिस्काउंट

iQOO 8 Legend

iQOO 8 Legend मध्ये तुम्हाला 1,440 x 3,200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह येतो, जो 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजने सपोर्टेड आहे.

iQOO 8 Legend मध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्स, 48-मेगापिक्सलचे अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 16-मेगापिक्सेलचे टेलिफोटो स्नॅपर दिले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळणार आहे. iQOO 8 Legend 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 4,500mAh बॅटरी देण्यात येईल.

Realme Narzo 50A Prime

Realme Narzo 50A या फोनमध्ये 6.5-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह 570 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळते. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता 6000 mAh असून फोन Mediatek Helio G85 CPU द्वारे Mali-G52 GPU, 4GB RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज सपोर्टसह येतो.

Realme Narzo 50A मध्ये मागील बाजूस 50MP प्रायमरी सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP B&W पोर्ट्रेट लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी समोर 8MP स्नॅपर आणि मागील बाजूस फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Redmi K50 Pro +
कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

Realme C35

Realme C35 720 x 1560 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह 6.6 इंच IPS LCD डिस्प्लेसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा परवडणारा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB इंचरनल स्टोरेजसह ऑक्टाकोर मीडियाटेक हेलिओ G80 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड असेल. यात 16-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे.

Redmi Note 11T

Redmi Note 11T मध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले पॅनल 20:9 अस्पेक्ट रेशो 399 PPI पिक्सेल डेन्सिटी, 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येतो. स्मार्टफोन अनेक व्हेरिएंटमध्ये येतो : ज्यामध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज, 6GB RAM आणि 128GB स्टोरेज, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजसह यांचा समावेश आहे. हे MIUI 12.5 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्ससह Android 11 OS वर चालते.

Redmi Note 11 च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरे आहेत, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचे प्रायमरी सेन्सर आणि पोर्ट्रेटसाठी 8-मेगापिक्सेलचा दुसरे डेप्थ सेन्सर आहे. तर समोर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com