Smog Tower : हवा प्रदूषणावर ‘स्मॉग टॉवर’ पुरेसे नाहीत! अमेरिकेच्या वैज्ञानिकाचा दावा; दीर्घकालीन प्रयत्नांची व्यक्त केली गरज

Air Pollution : अमेरिकेने स्वच्छ हवा कायद्याची १९६० मध्ये अंमलबजावणी केली. मात्र, आज एवढ्या वर्षांतर नुकतीच अमेरिकेत चांगल्या हवेच्या दर्जाची नोंद झाली आहे.
Smog Tower
Smog TowereSakal

Air Pollution and Smog Towers : हवेच्या सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणावर स्मॉग टॉवर्स आणि क्लाऊड सीडिंगसारखे खर्चिक उपाय योजले जात आहेत. मात्र, भारतातील हवेच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी हे उपाय शाश्वत नाहीत, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे, असे मत अमेरिकेचे वैज्ञानिक रिचर्ड पेल्टिअर यांनी ‘पीटीआय’ ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ते जागतिक आरोग्य संघटना तसेच जागतिक हवा प्रदूषण आणि आरोग्य तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य आहेत.

पेल्टिअर म्हणाले, की हवा प्रदूषण खरोखरच हानिकारक असल्याची कल्पना भारतात आहे. मात्र, हवा प्रदूषणाच्या मर्यादित वितरणामुळे अचूकता कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. देशाची राजधानी दिल्लीत हवा प्रदूषणाने परिसीमा गाठली असून ते कधीपर्यंत कमी होईल, असे विचारले असता अमेरिकेचे उदाहरण देत ते म्हणाले, की अमेरिकेने स्वच्छ हवा कायद्याची १९६० मध्ये अंमलबजावणी केली. मात्र, आज एवढ्या वर्षांतर नुकतीच अमेरिकेत चांगल्या हवेच्या दर्जाची नोंद झाली आहे.

त्यामुळे, अमेरिकेला कायद्याच्या अंमलबजावणीनंतरही स्वच्छ हवेचा टप्पा गाठण्यासाठी ५० ते ६० वर्षे लागली. त्यामुळे, या समस्येवर तत्काळ तोडगा निघू शकत नाही. त्याचप्रमाणे, एका कायद्याच्या किंवा कलमाच्या जोरावरही ही समस्या सुटणारी नाही. त्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा संयम ठेवायला हवा, असेही ते म्हणाले.

Smog Tower
Air Pollution : उत्तरेत हवेचा दर्जा सुधारला तर दक्षिणेत घसरला; ला निनाचा परिणाम

स्मॉग टॉवर्सच्या हवा प्रदूषणातील भूमिकेबद्दल ते म्हणाले,‘‘ हवा शुद्ध करणारी अशा प्रकारची मोठी उपकरणे छोट्या जागेवर काम करू शकतात. मात्र, खर्च व देखभाल अधिक असल्याने संपूर्ण शहरासाठी त्यांचा वापर करणे अव्यवहार्य आहे. ते हवेचे प्रदूषण कमी करू शकत नाहीत. खरे तर हवा प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग टॉवरचा वापर करणे म्हणजे मोठी नदी टॉवेलने पाणी काढून कोरडी करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करणेही शाश्वत उपाय नाही. तुम्हाला खरोखरच दिवसातील २४ तास आकाशात विमाने उडत राहावीत असे वाटते का? त्याचप्रमाणे, तुम्हाला खरेच दररोज पाऊस पडावा असे वाटते का, मला तसे वाटत नाही. त्यामुळे, त्याचे उत्तर नाही असावे.’’

Smog Tower
Music Therapy : वाद्य वाजवल्यामुळे चांगली राहते स्मरणशक्ती, मेंदू राहतो तरूण; रिसर्चमध्ये दावा

जागरूकता चांगली; उपकरणांची गरज

भारतात हवा प्रदूषणाची नोंद घेणारी उपकरणे व सेन्सर्सच्या कमतरतेमुळे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, कोठे हवा प्रदूषण जास्त आहे, ते आपल्याला पुरेशा अचूकतेने माहीत आहे. संपूर्ण भारतभर हवा प्रदूषण मोजणारी उपकरणे नसण्याची शक्यता आहे. मात्र, हवा प्रदूषण हानिकारक आहे, याची चांगली जागरूकता भारतात आहे. तरीही हवा प्रदूषण मोजणारी अधिक उपकरणे असल्यास ती चांगली बाब ठरेल.

९९ टक्के लोकसंख्येचा प्रदूषित हवेत श्वास

‘ग्रीनपीस’ या विचारगटाच्या अहवालानुसार भारतातील ९९ टक्के लोकसंख्या हवेच्या पीएम २.५ कणांबाबत ठरविलेल्या मानकांपेक्षा अधिक प्रदूषित हवेत श्वास घेते. त्याचप्रमाणे, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५६ टक्के लोकसंख्या व ६२ टक्के गर्भवती सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रांत राहतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com