
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनो सावधान! 'हे' कराल तर बँक खातं होईल रिकामं; जाणून घ्या
WhatsApp Fraud Alert: व्हॉट्सअॅपवर सतत नवनवीन फिचर्स येत असतात. काही दिवसांपूर्वी आलेले पेमेंट फिचरही खूप उपयुक्त आहे. वापरकर्त्यांना फक्त एक QR कोड स्कॅन करावा लागेल, रक्कम प्रविष्ट करावी लागेल आणि पैसे हस्तांतरित केले जातील. मात्र, ही प्रक्रिया सुलभ झाल्याने आता फसवणूक करणाऱ्यांचे लक्षही त्यावर लागले आहेत. काही स्कॅमर गुन्हे करण्यासाठी QR कोड प्रणाली वापरत आहेत आणि ते तुम्हाला फसवू शकतात. (Some scammers are defrauding people through the WhatsApp Pay QR code system)
हेही वाचा: डोळ्यावर विश्वास बसणार नाही इतकं भारी असेल तर लक्षात ठेवा.. हा स्कॅम आहे
WhatsApp QR कोड घोटाळा काय आहे?
QR कोड ही ऑनलाइन पेमेंटची सोपी पद्धत समजली जाते. मात्र यातून फसवणूक करणारेही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. तुम्ही एखादी वस्तू विकल्यास, फसवणूक करणारे तुमचे उत्पादन खरेदी करण्याचे नाटक करतात. यानंतर ते तुमच्यासोबत व्हॉट्सअॅपवर क्यूआर कोड शेअर करतात. (WhatsApp Scam in Marathi)
ते तुम्हाला ते Google Pay किंवा इतर कोणत्याही UPI-आधारित ऍप्लिकेशनद्वारे स्कॅन करण्यास सांगतात जेणेकरून पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करता येतील. फसवणूक करणाऱ्याची आज्ञा पाळल्याने तुम्हाला पैसे मिळण्याऐवजी बँक खाते रिकामे होते. वास्तविक, तुम्ही कोड स्कॅन करताच, तो तुम्हाला MPIN मागेल आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.
हेही वाचा: फोन पे अॅपद्वारे लाखोंची फसणवूक
फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?
1. ज्यांना ऑनलाइन पेमेंटचे फारसे ज्ञान नाही, त्यांनी त्याबद्दल माहिती घेणे किंवा रोखीने व्यवहार करणे केव्हाही चांगले.
2. जेव्हा तुम्हाला एखाद्याला पेमेंट करण्याची आवश्यकता असेल, तेव्हा तुम्ही नेहमी WhatsApp वर QR कोड स्कॅन केल्यानंतर नाव किंवा UPI आयडी दोनदा तपासा आणि नंतर पेमेंट करा.
3. नेहमी लक्षात ठेवा की पैसे अकाउंटवर येण्यासाठी MPIN कधीही प्रविष्ट करावा लागत नाही. जेव्हा तुमच्या बाजूने पैसे म्हणजेच तुम्ही पैसे पाठवणार असाल तेव्हाच तो प्रविष्ट करावा लागतो.
Web Title: Some Scammers Are Defrauding People Through The Whatsapp Pay Qr Code System
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..