Google Alert: गुलगलवर उलटसुलट सर्च करण्यापासून स्वत:ला आवरा, नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Alert

Google Alert: गुलगलवर उलटसुलट सर्च करण्यापासून स्वत:ला आवरा, नाहीतर...

Google: गुगलवर आपण बऱ्याच गोष्टी हल्ली सर्च करत असतो. अनेकदा आपल्याजवळ फावला वेळ असतो तेव्हा आपल्याला सुचेल ते आपण गुगलवर सर्च करत असतो. गुगलमुळे आपल्या ज्ञानसाठ्यातही भर पडते यात काही शंका नाहीच. मात्र काही गोष्टी सर्च करणे धोकादायक आणि अडचणीचे ठरू शकते. (Dont Search these things On google)

अनेकजण गुगल सर्चचा वापर चांगल्या गोष्टी सर्च करण्यासाठी होतो तर अनेकजण काही चुकीच्या गोष्टीही गुगलवर सर्च करत असतात. अनेकजण गुगलच्या मदतीने संवदेनशील गोष्टींची माहिती जाणून घेत असतात. अशा अनेक लोकांवर न्यायालयात खटला देखील चालवल्या गेलाय. मात्र अनेकांना गुगलवर नेमकं काय सर्च करायचं आणि काय करू नये याबाबत संभ्रम असू शकतो. अशांसाठी ही माहिती महत्वाची ठरू शकतो.

हेही वाचा: Google Alert : गूगलवर सर्च करताय 'या' गोष्टी? महागात पडेल; तुरूंगात जावे लागू शकते

या गोष्टी शक्यतो टाळा

१) शस्त्रे बनवण्याची प्रक्रिया

२) चाईल पॉर्नोग्राफी

३) धार्मिक दंगे निर्माण करणारे विषय किंवा कंटेंट

हेही वाचा: Child Pornography : देशातील 20 राज्यांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' अंतर्गत मोठी कारवाई

गुगलवर आपण काय सर्च करतोय याबाबत फक्त आपल्यालाच माहिती असते असा अनेकांचा संभ्रम असतो. मात्र हा अनेकांचा गैरसमज आहे. शस्त्रे बनवण्याची प्रक्रिया जर का तुम्ही चुकूनही बघत असाल तर वेळीच थांबवा. तर काही जण चाईल्ड पॉर्नोग्राफीचेही व्हिडिओज बघत असतात.

हेही वाचा: Google एका सेकंदाला किती कमावतो?

मात्र भारतीय कायद्यानुसार (Court) चाईल्ड पॉर्नोग्राफी बघणे गुन्हा ठरत असून तर त्यावर पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. पहिल्यांदा असे करणाऱ्यास पाच तर दुसऱ्यांदा असे करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. यापेक्षाही तुम्ही काही गैर सर्च करत असाल तर लगेच थांबवलं पाहिजे याचा गंभीर परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो.