पृथ्वीजवळील सर्वांत मोठा ब्लॅकहोल आला आणखी जवळ; फक्त 2 हजार प्रकाशवर्षे दूर

blackhole
blackhole

टोकीयो : आपल्या आकाशगंगेच्या मधोमध Sagittarius A* नावाचा एक मोठा ब्लॅकहोल आहे. या ब्लॅकहोलचे वस्तुमान आपल्या सूर्यापेक्षाही 40 लाख पटीने अधिक आहे. आणि आता या ब्लॅकहोलविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. आता वैज्ञानिकांनी हा शोध लावलाय की आधीपेक्षाही आपण या ब्लॅकहोलपासून 200 प्रकाशवर्ष जवळ आहोत. मात्र, याचा अर्थ असा नाहीये की, आपली या ब्लॅकहोलसोबत टक्कर होणार आहे. 

ब्लॅकहोल जवळ आलाय?
वास्तविकत: हा ब्लॅकहोल पृथ्वीच्या जवळ आला नाहीये तर नव्या आणि सटीक माहितीच्या आधारे नव्या मॉडेलद्वारे याच्या स्थितीची माहिती मिळाली आहे. जवळपास 15 वर्षांपासून जपानच्या एका रेडीओ ऍस्ट्रॉनॉमी प्रोजक्ट VERA या ब्लॅकहोलशी निगडीत माहिती गोळा करत होता. इंटरफेरोमेट्रीच्या टेकनिकने VERAने जपानमध्ये टेलिस्कोप्समधून हा डेटा एकत्र केला आणि त्या आधीपासून असलेल्या डेटासोबत एकत्र करत Milky Way चा सर्वांत उत्तम नकाशा बनवला आहे. 

गॅलेक्सी क्लस्टर्स जगातील सर्वांत मोठे ऑब्जेक्ट असतात. हे गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांशी निगडीत राहतात. या संपूर्ण सिस्टमला Abell 2384 असं नाव दिलंय. गॅलेक्सी क्लस्टरमध्ये शेकडो गॅलेक्सी असतात. तसेच अनेक लाख डिग्री तापमानावर गॅसेस जे एक्स-रेच्या उपस्थितीमध्ये चमकतात. सोबतच मोठ्या प्रणाणावर डार्क मॅटर देखील असतो. Abell 2384 मध्ये अत्यंत गरम गॅसेसचा ब्रिज असतो ज्याचा फोटो NASA च्या Chandra X-Ray Observatory, ESA च्या XMM-न्यूटन आणि भारतच्या जायंट मीटरव्हेव रेडीओ टेलिस्कोपमधून तयार केली गेली आहे. एका गॅलेक्सी क्लस्टरच्या मधोमध मोठा ब्लॅक  होल आहे ज्यातून एक जेट निघताना दिसून येत आहे. हा जेट इतका शक्तीशाली आहे की यामुळे दोन्ही गॅलक्सीच्या दरम्यान गॅसचा एक पूल बनला आहे. हा पूल 30 लाख प्रकाशवर्षे मोठा आहे. याचे वस्तूमान 6 ट्रिलयीन सूर्यांइतके आहे. 

जाहीर केलेल्या फोटोमध्ये पुलचा आकार आणि हा विशाल ब्लॅकहोल पाहता येईल. ज्या ठिकाणी दोन्ही क्लस्टर्सवर टक्कर झाली होती. आपल्या आकाशगंगेच्या 99 पॉइट्सच्या स्थिती आणि गतीच्या आधारवर VERAने हा शोध लावलाय की Sagittarius A* ही 25,800 प्रकाशवर्षे दूर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com