TATA या दिवशी लाँच करणार नवीन कार; जाणून घ्या डिटेल्स

टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच नवीन इलेक्ट्रिक सादर करणार आहे.
TATA NEXON
TATA NEXONSAKAL

टाटा मोटर्स (Tata Motors) 6 एप्रिल रोजी नवीन इलेक्ट्रिक सादर करणार आहे. मात्र याआधी कंपनीने या वाहनाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये 'डिफरंट इज इलेक्ट्रीफाइंग' असे लिहिले आहे आणि वाहनाचे बॉडी पॅनेल दाखवले आहे. तथापि, कंपनीने अद्यापही वाहनाची माहिती शेअर केलेली नाही. परंतु काही रिपोर्टनुसार ही नवीन Tata Nexon EV असू शकते. कंपनी अद्ययावत टिगोर ईव्ही, अल्ट्रोज ईव्ही आणि पंच ईव्हीसह तीन नवीन इलेक्ट्रिक कारवर देखील काम करत आहे.

TATA NEXON
Tata लॉंच करणार 'या' 4 इलेक्ट्रिक कार; काय असेल खास? वाचा

2022 Tata Nexon EV मध्ये 40kWh बॅटरी पॅकसह येऊ शकते, जी जी पूर्ण चार्ज केल्यावर 400km पेक्षा जास्त रेंज देईल. कंपनी लहान बॅटरी पॅकसाठी सध्याच्या 3.3kW AC चार्जरसह अधिक शक्तिशाली 6.6kW AC चार्जर देखील देऊ शकते.

या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या डिझाईनमध्ये काही बदल आणि फिचर अपग्रेडही करण्यात आले आहेत. नवीन Nexon EV हवेशीर जागा, एअर प्युरिफायर, क्रूझ कंट्रोल, पार्किंग मोड आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता प्रणालीसह येऊ शकते.

TATA NEXON
Tata Neu App आज होणार लाँच; रेशनपासून बिल भरण्यापर्यंत अनेक सेवा उपलब्ध

अलीकडेच, नवीन Tata Tigor EV चा प्रोटोटाइप देशात टेस्टींगदरम्यान कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. रिपोर्टनुसार या इलेक्ट्रिक सेडान मोठ्या बॅटरी पॅकसह येईल. आत्तापर्यंत, टिगोर ईव्ही 26kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटरसह येते. पूर्ण चार्ज झाल्यावर, त्याची रेंज सुमारे 375km-400km आहे. 2022 Tata Tigor EV ला अपडेटेड सस्पेंशन मिळू शकते, ज्यामुळे गाडीचे वजन वाढू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com