Electric Motorcycle चे हे 10 शानदार ऑप्शन्स दर महिन्याला वाचवतील तुमचे हजारो रुपये, बघा किंमत

आज आम्ही तुम्हाला 2 लाखांच्या आत अशा काही लोकप्रिय बाइक्सच्या किंमती आणि बॅटरी रेंजबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमची महिन्याला पैशांची बरीच बचत होऊ शकते
Electric Motorcycle
Electric Motorcycleesakal

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक मोटरसायकलची विक्री दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि नवीन दुचाकी कंपन्याही त्यांचे नवीनवीन मॉडेल्स बाजारात सादर करत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये Hope Oxo आणि Mater Aira यासह अनेक इलेक्ट्रिक मोटारसायकली लॉन्च झाल्या आहेत. रिव्हॉल्ट RV400, Torq Kratos आणि Oberon Roar यासह कोमाकी आणि अल्ट्राव्हायोलेट सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल आधीपासूनच प्रचलित आहेत.

तुम्हीही स्वतःसाठी एक चांगली इलेक्ट्रिक मोटरसायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला 2 लाखांच्या आत अशा काही लोकप्रिय बाइक्सच्या किंमती आणि बॅटरी रेंजबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमची महिन्याला पैशांची बरीच बचत होऊ शकते.

या इलेक्ट्रिक बाइक्सची होते सर्वाधिक विक्री

भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकलबद्दल बोलायचे झाल्यास, लोकांना रिव्हॉल्ट RV400 आवडते. त्याची किंमत 1.32 लाख रुपये आहे. रिव्हॉल्ट RV400 3.24 KWh बॅटरीद्वारे अॅस्पिरेटेड आहे आणि एका चार्जवर 150 किमी पर्यंत चालते. त्याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. तर, टॉर्क क्रॅटोसची किंमत 1.22 लाख रुपये आहे. हे 4 kWh बॅटरीद्वारे अॅस्पिरेटेड आहे, ज्याची रेंज एका चार्जवर 180 किमी पर्यंत आहे आणि 100 किमी प्रतितास इतका वेग आहे.

होप, ओबेन आणि मॅटर च्या या काही इलेक्ट्रिक मोटरसायकल

लोकप्रिय इलेक्ट्रिक मोटारसायकलींपैकी, Hop Oxo ची किंमत 1.64 लाख रुपये आहे. या बाइकमध्ये 3.75 Kwh बॅटरी आहे, ज्याची रेंज 150 किमी आणि टॉप स्पीड 95 किमी प्रतितास आहे. तर, ओबेन रोरची किंमत 1.02 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 4.4 kwh बॅटरीद्वारे समर्थित आहे, ज्याची श्रेणी 200 किमी पर्यंत आहे आणि 100 किमी प्रतितास इतका वेग आहे. सर्वात अलीकडील लाँच, Matter Aera ची किंमत Rs 1.43 लाख आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 5 kWh बॅटरी आहे, ज्याची रेंज एका चार्जवर 125 किमी आहे.

Electric Motorcycle
E-Bike : ही इ-बाइक चालवण्यासाठी लागत नाही ड्रायव्हिंग लायसंस

इलेक्ट्रिक बाइक्सची मोठी लाइनअप

इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये हे दोन उत्तम प्रोडक्ट आहेत, ज्यामध्ये Komaki MX3 ची किंमत 95,000 रुपये आहे. एका चार्जवर त्याची बॅटरी रेंज 85 किमी पर्यंत आहे. तर कोमाकी रेंजरची किंमत 1.68 लाख रुपये आहे. एका चार्जवर त्याची बॅटरी रेंज 200 किमी पर्यंत आहे.

One Electric Motorcycles Kridn ची भारतीय बाजारपेठेत किंमत 1.35 लाख रुपये आहे. जी 3 kWh बॅटरीद्वारे अॅस्पिरेटेड आहे, ज्याची बॅटरी एका चार्जवर 110 किमी पर्यंत आणि 95 किमी प्रतितास इतका वेगवान आहे. कबीरा मोबिलिटी KM 4000 ची किंमत 1.36 लाख रुपये आहे. हे 4.4 kWh बॅटरीद्वारे अॅस्पिरेटेड आहे, ज्याची बॅटरी सिंगल चार्जवर 150 किमी आहे आणि 120 किमी प्रतितास इतका वेग आहे. Ultraviolette F77 ची किंमत 3.80 लाख रुपये आहे. हे 10.3 kWh बॅटरीद्वारे अॅस्पिरेटेड आहे, ज्याची रेंज एका चार्जवर 307 किमी आणि 147 किमी प्रतितास इतकी आहे.

Electric Motorcycle
Upcoming Bikes : होंडा पासून बजाजपर्यंत, या महिन्यात लाँच होणार एकसो एक बाइक्स

या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल चार्जिंगवरच्या असल्याने तुमचे महिन्याचे पेट्रोलचे बरेच पैसे वाचतात. तसेच याची बॅटरी रेंजसुद्धा फार चांगली असल्याने तुम्ही सहज फार दुरवर जाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com