Twitter New Rule : ट्विटरवर फजिलपणा करणाऱ्यांनो खबरदार! अकाउंट होणार थेट ब्लॉक...वाचा नवा नियम

ट्विटरद्वारे 1 फेब्रुवारी 2023 पासून नवीन नियम लागू केले जात आहेत, ज्यामुळे गुंडप्रवृत्तीला आळा घातला जाईल
Twitter New Rule
Twitter New Ruleesakal

Twitter New Rule : ट्विटर हे एक लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. जिथे रोज करोडो ट्विट केले जातात. मात्र, अलीकडच्या काळात ट्विटरवर यूजर्सचा फजिलपणा वाढला आहे. लोक ट्विटरचा वापर एक साधन म्हणून करत आहेत, जिथे एका ट्विटवर कोणालातरी ट्रोल केल्या जातं. तसेच, त्यांच्याशी अपमानास्पद आणि असभ्य भाषेत बोलले जाते. मात्र, ट्विटरने याप्रकरणी कठोर पावले उचलली आहेत. ट्विटरद्वारे 1 फेब्रुवारी 2023 पासून नवीन नियम लागू केले जात आहेत, ज्यामुळे गुंडप्रवृत्तीला आळा घातला जाईल. आणि अशांवर कारवाईसुद्धा केली जाईल.

ट्विटरच्या नवीन नियमांनुसार यूजर्सना ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्याचा अधिकार मिळणार आहे. म्हणजे जर एखाद्या Twitter हँडलने तुमच्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला त्या ट्विटर हँडलच्या निलंबनावर अपील करण्याचा अधिकार असेल. त्यानंतर ट्विटर ते खाते ब्लॉक करेल.

Twitter खाते एकदा ब्लॉक झाल्यास अनब्लॉक होणे कठीण

एकदा ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर यूजर्स ते लवकरच अनब्लॉक करू शकणार नाहीत, हे स्पष्ट करा. खरे तर ट्विटरने अकाउंट रिस्टोअर करण्याचे नियम कडक केले आहेत. तुम्ही खाते रिस्टोअर करण्याची विनंती केल्यास, त्याचे पुनरावलोकन केले जाईल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणारे ट्विटर हँडल कायमचे बंद केले जाऊ शकते. सोशल मीडिया अकाऊंटच्या नियमांचे उलंघन केल्यास तुमचे ट्विट अधिक लोकांपर्यंत पोहोचणार नाही.

Twitter New Rule
Twitter: मस्क आल्यापासून ट्विटरला लागलं ग्रहण, 20 कोटी यूजर्सचा डेटा लीक; तुमचे अकाउंट असेल तर सावधान

ट्विटर अकाउंट केव्हा ब्लॉक होऊ शकतं?

ट्विटर हँडलद्वारे कम्युनिटी गाइडलाइनचे उल्लंघन केल्यास ते ब्लॉक केले जाईल. यामध्ये दिशाभूल करणारे काँटेंट, धमकावणे किंवा लैंगिक छळाची भाषा यांचा समावेश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com