Mobile Launch : मोबाईल प्रेमींसाठी जुलै महिना एकदम खास.! लाँच होणार 5 सुपर स्मार्टफोन, परवडणारी किंमत अन् जबरदस्त फीचर्स एकदा बघाच..

July 2025 Smartphone Launch : जुलैमध्ये Nothing, Samsung, OnePlus, OPPO, Vivo आणि Realme हे नामांकित ब्रँड्स नवे स्मार्टफोन बाजारात उतरवत आहेत.
July 2025 Smartphone Launch
July 2025 Smartphone Launchesakal
Updated on

July 2025 Mobile Launch : मोबाईल प्रेमींसाठी जुलै महिना एक पर्वणी ठरणार आहे. Nothing, Samsung, OnePlus, OPPO, Vivo आणि Realme हे आघाडीचे ब्रँड्स आपापले नवीन स्मार्टफोन मॉडेल्स या महिन्यात भारतीय मार्केटमध्ये लाँच करणार आहेत. फोल्डेबल डिव्हाईसेसपासून ते प्रीमियम मिडरेंज फोनपर्यंत, विविध किंमतीचे मोबाईल जुलैमध्ये पहायला मिळणार आहे.

Nothing Phone 3

Nothing चा नवा Phone 3 अधिक वेगवान आणि स्मार्ट झाला आहे. यामध्ये नवीन Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर, आकर्षक "Glyph Matrix" LED बॅक डिझाईन आणि पहिल्यांदाच 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला गेला आहे, ज्यामुळे झूम फोटोग्राफीत मोठी झेप घेतली आहे. हा मोबाईल 1 जुलैला लाँच होणार आहे

मुख्य फीचर्स

  • 6.77-इंच LTPO AMOLED डिस्प्ले, 120Hz

  • Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर

  • ट्रिपल रिअर कॅमेरा: 50MP + टेलीफोटो

  • 32MP सेल्फी कॅमेरा

  • 5150mAh बॅटरी, 65W वायर्ड व 20W वायरलेस चार्जिंग

July 2025 Smartphone Launch
Motorola Razr 50 Ultra मोबाईल झाला एकदम स्वस्त! मिळतोय चक्क 35 हजारांचा बंपर डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर..

OPPO Reno 14 सीरिज

OPPO आपल्या लोकप्रिय Reno सिरीजचा पुढचा टप्पा म्हणजे Reno 14 Pro आणि Reno 14 सादर करणार आहे. दोन्ही फोन AI-सक्षम फोटोग्राफी आणि उच्च दर्जाचे OLED डिस्प्ले घेऊन येत आहेत. 3 जुलैला लाँच होणार आहे

मुख्य फीचर्स

  • 6.83-इंच OLED डिस्प्ले, 1.5K रिझोल्यूशन

  • Dimensity 8450 आणि 8350 प्रोसेसर

  • 16GB RAM आणि 1TB स्टोरेजपर्यंत पर्याय

  • ट्रिपल 50MP रिअर कॅमेरे आणि 50MP सेल्फी

  • 6,200mAh बॅटरी, 80W सुपर फास्ट चार्जिंग

July 2025 Smartphone Launch
Video : लोणी काळभोरमध्ये झळकले इराणचे झेंडे अन् खामेनींचे पोस्टर्स; खळबळजनक Video व्हायरल, तुम्हीही पाहून शॉक व्हाल..

OnePlus Nord 5 सीरिज

OnePlus Nord 5 आणि Nord CE 5 हे प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये उतरवणार आहे. खासकरून मोठ्या बॅटरी आणि दमदार कामगिरीवर भर देण्यात आला आहे. ८ जुलैला लाँच होणार आहे

मुख्य फीचर्स

  • 6.74-इंच OLED, 1.5K रिझोल्यूशन

  • Nord 5 मध्ये Snapdragon 8s Gen 3, CE 5 मध्ये Dimensity 8350

  • 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप

  • 7,000mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग

July 2025 Smartphone Launch
iPhone Resale : अ‍ॅपल कंपनीची सुवर्णसंधी! 'या' 5 जुन्या मॉडेलचे आयफोन तुम्हाला बनवू शकतात लखपती, रिसेल किंमत झाली डबल

Samsung Galaxy Z Foldables

Samsung चा बहुप्रतिक्षित Galaxy Unpacked 2025 कार्यक्रम ९ जुलै रोजी होणार आहे. यामध्ये Galaxy Z Fold 7, Z Flip 7, तसेच संभाव्य Z Fold Ultra आणि FE Flip सादर होण्याची शक्यता आहे. यावेळी त्रि-फोल्ड डिव्हाईसचे प्रोटोटाइप देखील दाखवले जाऊ शकते. ९ जुलैला लाँच होणार आहे

Vivo X200 FE

Vivo आपल्या X सीरिजमधील पहिला Fan Edition (FE) स्मार्टफोन घेऊन येत आहे. या फोनमध्ये शक्तिशाली Dimensity 9300+ प्रोसेसर, Zeiss कॅमेरे, आणि 4K फ्रंट व्हिडिओ रेकॉर्डिंग सारखी फीचर्स असतील. या स्मार्टफोनचे लाँच लवकरच होईल याची तारीख अद्याप जाहीर नाही

मुख्य फीचर्स

  • 6.31-इंच AMOLED, 120Hz

  • 50MP + 50MP + 8MP रिअर कॅमेरा

  • 6,500mAh बॅटरी, 90W चार्जिंग

July 2025 Smartphone Launch
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली आणखी एका नव्या फीचरची एन्ट्री; पाहा एका क्लिकवर..

Realme 15 सीरिज

Realme देखील आपली 15 आणि 15 Pro मॉडेल्स या महिन्यात सादर करणार आहे. जरी तपशील अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्रभावी फीचर्स आणि किफायतशीर किंमत यांची अपेक्षा केली जात आहे. या स्मार्टफोनचे लाँच लवकरच होईल याची तारीख अद्याप जाहीर नाही

जुलै २०२५ मध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारात एकाहून एक भन्नाट फोन येणार आहेत. डिझाईन, कामगिरी आणि फोटोग्राफीच्या बाबतीत हे डिव्हाईस एकमेकांना जबरदस्त स्पर्धा देणार आहेत. तंत्रज्ञानप्रेमींसाठी ही एक संधीच आहे नव्या इनोव्हेशनचा अनुभव घेण्याची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com