मोबाइल रिचार्ज महागणार; पुढच्या महिन्यापासून टॅरिफ वाढण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

कंपन्यांनी टेरिफमध्ये 20 ते 25 टक्के वाढ करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 

नवी दिल्ली - 2021 मध्ये तुमच्या मोबाइलच्या बिलामध्ये 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आता त्यांच्या सेवांमध्ये पुन्हा एकदा टॅरिफ प्लॅन रिवाइज करण्याची शक्यता आहे. याआधी डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ केली होती.

खाजगी क्षेत्रातील या टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे की, व्हॉइस आणि डेटा सर्व्हिसेससाठी इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा वाढली आहे. यामध्ये टिकून राहणं कठीण आहे. कंपन्यांचे प्रतिनिधी टेलकॉम रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियासोबत चर्चा करत आहेत. 

हे वाचा - 500 रुपयांच्या आतील सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन

भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया वर्षाच्या शेवटपर्यंत टेरिफमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकतात. या कंपन्यांनी टेरिफमध्ये 20 ते 25 टक्के वाढ करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. गेल्या काही काळात व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. दोन्ही कंपन्या एक झाल्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेमही युजर्सना येत होता. 

कंपनीने ट्रायकडे मागणी केली आहे की, व्हॉइस आणि डेटा सर्व्हिसेससाठी दरांमध्ये वाढ करण्यात यावी. यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील स्पर्धा कायम राहील. नुकतंच Vi चे सीईओ रविंदर टक्कर यांनी म्हटलं होतं की, टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉइस आणि डेटा सर्व्हिसेसच्या टॅरिफमध्ये वाढ करण्यापासून मागे हटू नये. येत्या काही दिवसात सर्वात आधी टॅरिफ वाढवण्याची घोषणा करू शकते.

खुशखबर! PUBGचं भारतात 'कमिंग सून', सोशल मीडियावर टिझर लाँच

गेल्या रविवारी भारती एअरटेलचे चेअरमन सुनिल भारती मित्तल यांनी सांगितलं होतं की, सध्या मोबाइल सर्व्हिसेसचे दरानुसार बाजारात टिकणं कठीण आहे. मात्र दरांमध्ये वाढ गरजेची आहे. याबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी बाजारातील परिस्थिती पाहून घेतला जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vodafone idea airtel mobile tarrif plan hike may be from next month