Shubhanshu Shukla Space Launch : अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज घेणार अंतराळ झेप; ऐतिहासिक क्षण इथे पाहा..

Shubhanshu Shukla Space Launch Watch Live : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्सच्या 'ड्रॅगन' यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना होणार आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक लॉंचचे लाईव्ह प्रक्षेपण बघा एका क्लिकवर..
Shubhanshu Shukla Space Launch Watch Live
Shubhanshu Shukla Space Launch Watch Liveesakal
Updated on

Shubhanshu Shukla Space Watch Live : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे, कारण भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्सच्या 'ड्रॅगन' यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेपावणार आहेत. अ‍ॅक्सिअम मिशन 4 (Ax-4) अंतर्गत होणाऱ्या या मोहिमेचा प्रक्षेपण आज (बुधवार) दुपारी 12.01 वाजता (भारतीय वेळेनुसार) नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लॉन्च पॅड 39A वरून करण्यात येणार आहे.

शुभांशू शुक्ला हे भारताच्या महत्वाकांक्षी 'गगनयान' कार्यक्रमाशी संबंधित आहेत. या खासगी मोहिमेमध्ये त्यांना पायलटची जबाबदारी देण्यात आली आहे, ज्यात प्रक्षेपणपूर्व तपासणी तसेच ISS शी यान जोडण्याची प्रक्रिया ते पाहणार आहेत. या मोहिमेमुळे भारताचे ISS वरील अस्तित्व प्रथमच नोंदवले जाणार आहे, जे भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक मोठे पाऊल आहे.

Ax-4 मोहिमेचे नेतृत्व माजी NASA अंतराळवीर आणि सध्या अ‍ॅक्सिअम स्पेसच्या मानव अंतराळ उड्डाण संचालिका असलेल्या पेगी व्हिटसन या करत आहेत. त्यांच्या सोबत युरोपियन स्पेस एजन्सीचे पोलंडचे स्लावॉश उझ्नान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कापु हे दोन मिशन स्पेशालिस्ट आहेत.

Shubhanshu Shukla Space Launch Watch Live
Shubhanshu Shukla NASA Axiom Mission Launch: भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या यानाचे उड्डाण, उद्या गाठणार लक्ष्य

भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी ही मोहीम ऐतिहासिक आहे, कारण या तिघा देशांचे अंतराळवीर प्रथमच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जास्त दिवस मुक्काम करून वैज्ञानिक संशोधन करणार आहेत. ही मोहीम ३१ देशांच्या सहकार्याने तयार करण्यात आली असून 60 पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग आणि प्रात्यक्षिके दोन आठवड्यांच्या काळात राबवण्यात येणार आहेत.
या प्रयोगांमध्ये मानवी आरोग्य, पृथ्वी निरीक्षण आणि जीवनशास्त्र यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. विविध देशांतील संशोधकांच्या सहभागामुळे ही मोहीम जगातील सर्वात बहुपक्षीय खासगी अंतराळ मोहिम ठरली आहे.

Shubhanshu Shukla Space Launch Watch Live
लॉन्च झाला तुमच्या खिशाला परवडणारा Oppo K13x 5G ; किंमत फक्त 11 हजार, जबरदस्त फीचर्स एकदा बघाच

स्पेसएक्सच्या नव्या Crew Dragon यानाचा हा पहिलाच प्रवास असून, तो फाल्कन ९ रॉकेटच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. ह्यूस्टनस्थित अ‍ॅक्सिअम स्पेस ही कंपनी अशा प्रकारच्या खासगी मोहिमा आयोजित करत असून, जगभरातील देशांना आणि संस्थांना लो-अर्थ ऑर्बिटमध्ये प्रवेश मिळवून देण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या ऐतिहासिक प्रक्षेपणाचा थरार संपूर्ण जगात थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणार आहे. भारतातील नागरिकांसाठीही ही एक अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com