Malware : लोकप्रिय अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये मिळाला धोकादायक मालवेअर; लाखो लोकांचा डेटा धोक्यात!

Xamalicious नावाचा हा मालवेअर असलेले कित्येक अ‍ॅप्स समोर आले आहेत. या अ‍ॅप्सना आतापर्यंत लाखो लोकांनी डाऊनलोड केलं असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
Android Malware
Android MalwareeSakal

Dangerous Malware Found in Android Apps : तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याच वेगाने हॅकर्स देखील लोकांचा डेटा चोरण्याच्या नवनवीन पद्धतींचा शोध लावत आहेत. यासाठी वापरण्यात येणारा सर्वात साधारण मार्ग म्हणजे, विविध अ‍ॅप्सचा वापर. McAfee संस्थेच्या संशोधकांनी अँड्रॉईड यूजर्सना एक गंभीर इशारा दिला आहे. या संस्थेने मालवेअर असणाऱ्या काही अ‍ॅप्सची माहिती दिली आहे.

या संशोधकांना एका नव्या मालवेअरबाबत माहिती मिळाली आहे. Xamalicious नावाचा हा मालवेअर असलेले कित्येक अ‍ॅप्स समोर आले आहेत. या अ‍ॅप्सना आतापर्यंत लाखो लोकांनी डाऊनलोड केलं असल्याचंही स्पष्ट झालं आहे. तुमच्याही स्मार्टफोनमध्ये यातील एखादं अ‍ॅप असेल, तर ते तातडीने डिलीट करण्याचा सल्ला मॅकअ‍ॅफीने दिला आहे.

विशेष म्हणजे हे अ‍ॅप्स गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध होते. या अ‍ॅप्सनी गुगलची सिक्युरिटी सिस्टीम कशी ओलांडली याबाबत तपास सुरू आहे. हे सर्व अ‍ॅप्स आता प्ले-स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. मात्र ज्या यूजर्सच्या फोनमध्ये आधीपासून हे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात आलेले आहेत, त्यांनी तातडीने ते अनइन्स्टॉल करावेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Android Malware
Chameleon Trojan Malware : अँड्रॉईड मोबाईलच्या सर्व सिक्युरिटी भेदतोय नवा मालवेअर; तज्ज्ञांनी दिला इशारा

कोणते आहेत हे अ‍ॅप्स?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हा मालवेअर असणारे सुमारे 19 अ‍ॅप्स समोर आले आहेत. यातील सर्वात लोकप्रिय अशा सात अ‍ॅप्सची नावं उघड झाली आहेत.

इसेन्शिअल होरोस्कोप फॉर अँड्रॉईड (Essential Horoscope for Android), थ्रीडी स्किन एडिटर फॉर माईनक्राफ्ट (3D Skin Editor for PE Minecraft), लोगो मेकर प्रो (Logo Maker Pro) या तीन अ‍ॅप्सना प्रत्येकी एक लाखांहून अधिक यूजर्सनी डाऊनलोड केलं आहे.

ऑटो क्लिक रिपीटर (Auto Click Repeater), काउंट इझी कॅलरी कॅल्क्युलेटर (Count Easy Calorie Calculator), डॉट्स : वन लाईन कनेक्टर (Dots: One Line Connector) या अ‍ॅप्सना प्रत्येकी दहा हजार यूजर्सनी डाऊनलोड केलं आहे. तर साऊंट व्हॉल्यूम एक्स्टेंडर (Sound Volume Extender) या अ‍ॅपला पाच हजारांहून अधिक यूजर्सनी डाऊनलोड केलं आहे.

Android Malware
Malware : गुगलच्या प्ले-स्टोअरवरुन वर्षभरात 60 कोटींहून अधिक मालवेअर डाऊनलोड; तुमच्या फोनमध्ये नाहीत ना 'हे' अ‍ॅप्स?

किती धोकादायक मालवेअर?

Xamalicious हा मालवेअर .NET फ्रेमवर्कवर आधारित एक अँड्रॉईड बॅकडोअर आहे. Xamarin या ओपन सोर्स फ्रेमवर्कचा वापर करून तयार करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये हा मालवेअर सहजपणे मिसळून जातो. स्मार्टफोनमध्ये आल्यानंतर हा मालवेअर अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंग्सची परवानगी मिळवतो. यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टी तो रेकॉर्ड करू शकतो, तसंच बॅकग्राऊंडमध्ये इतर अ‍ॅप्समधील डेटा चोरण्याचं कामही हा मालवेअर करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com