लवकरच येतायत रेडमीचे दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन; येथे पाहा डिटेल्स

xiaomi will soon launch new budget redmi smartphones redmi 10c and redmi 10a in india check details
xiaomi will soon launch new budget redmi smartphones redmi 10c and redmi 10a in india check details

New Budget Redmi Smartphones : स्मार्टफोन कंपनी Xiaomi कडून लवकरच भारतात Redmi 10A आणि Redmi 10C हे दोन स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. हे स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतील. तसेच त्याचा मुख्य कॅमेरा सेन्सर 50MP चा असेल. फोन Mediatek चिपसेट सह येईल.

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी Redmi 10A स्मार्टफोनची किंमत ही 12,000 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान ठेवणार आहे. Redmi 10A स्मार्टफोन तीन कोडनेमसह येईल. Redmi 10A थंडर आणि लाइट या कोडनेमने सादर करण्यात आले आहे. Redmi 10C हे फॉग, रेन आणि विंड या कोडनेमने लिस्ट करण्यात आले आहेत. दरम्यान दोन्ही स्मार्टफोन्समध्ये MediaTek चिपसेट सपोर्ट दिला जाईल.

कॅमेरा सेटअप

या Redmi 10A आणि Redmi 10C मॉडेल्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्याचा मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेल असेल, जो Samsung ISOCELL S5KJN1 सेन्सर आणि OmniVision OV50C सेन्सर सपोर्टसह येईल. Redmi 10A आणि Redmi 10C स्मार्टफोन्समध्ये 8-मेगापिक्सेलचा दुसरा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला जाईल. याशिवाय 2-मेगापिक्सलचा OV02B1B किंवा SC201CS मॅक्रो लेन्स दिली जाईल.

xiaomi will soon launch new budget redmi smartphones redmi 10c and redmi 10a in india check details
Micromax In Note 2 : 48MP कॅमेरा अन् 30W फास्ट चार्जिंगसह लॉन्च

Redmi 9A चे अपग्रेडेड व्हर्जन

जरी Xiaomi ने Redmi 10A आणि Redmi 10C स्मार्टफोन्सचे डिटेल्स जारी केले नाहीत. मात्र Redmi 10A आणि Redmi 10C स्मार्टफोन्स Redmi 9A आणि Redmi 9C ची अपग्रेड केलेली आवृत्ती असतील. हे दोन्ही स्मार्टफोन 2020 मध्ये मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आले होते. यानंतर Redmi 9A भारतात लॉन्च करण्यात आला.

संभाव्य किंमत

Redmi 9A स्मार्टफोनच्या 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 7,499 रुपये आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,299 रुपये आहे. Redmi 9C स्मार्टफोनचे 2 GB आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंट मलेशियामध्ये सुमारे 7,500 रुपयांना लॉन्च करण्यात आले होते.

xiaomi will soon launch new budget redmi smartphones redmi 10c and redmi 10a in india check details
Redmi Note 11 ग्लोबल व्हेरिएंटचे लॉंच 26 तारखेला, पाहा अपेक्षित फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com