

YouTube introduces AI-powered multilingual video dubbing, allowing creators to reach global audiences by translating videos into 27 languages.
YouTube Introduces AI-Powered Video Dubbing Feature : यूट्यूबशी निगडीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जी लाखो क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कारण, गुगलच्या या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने भाषेचा मोठा अडथळा दूर केला आहे.
होय, यामुळे आता क्रिएटर्स त्यांचे व्हिडिओ २७ भाषांमध्ये अपलोड करू शकणार आहेत. हे AI-आधारित फिचर क्रिएटर्सना त्यांचे अपलोड केलेले व्हिडिओ ऑटो-डब करण्याची परवानगी देते. त्यामुळे क्रिएटर्स आता त्यांच्या अपलोड केलेल्या व्हिडिओंसाठी भारतीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय भाषांचीही निवड करू शकणार आहेत.
Google ने अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये या ऑटो-डब फिचर्सबद्दल माहिती शेअर केली. ब्लॉग पोस्टनुसार, YouTubeचे ऑटो-डब फिचर २७ भाषांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने अशीही आकडेवारी शेअर केली आहे की, जगभरात दररोज जवळपास ६ दशलक्ष प्रेक्षक आहेत जे किमान १० मिनिटे ऑटो-डब केलेला कंटेट बघतात. हे फिचर डिसेंबरमध्येच टेस्टिंगसाठी सादर करण्यात आले होते.
याव्यतिरिक्त, YouTube साठी एक्सप्रेसिव्ह स्पीच फिचर देखील आणण्यात आले आहे, ज्यामुळे कंटेट क्रिएटर्स त्यांच्या YouTube चॅनेलवर आठ भाषांमध्ये एक्सप्रेसिव्ह स्पीच डब करू शकतात. यामध्ये इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.