

Tata Group Leadership and the Question of Control
esakal
हल्ली आदर वाटावा असे उद्देगपती म्हणजे बोटावर मोजण्याइतकेच असावेत. पण त्यामध्ये भारतात महत्त्वाची नावं घेतली जातात ती म्हणजे जमशेदजी टाटा, रतन टाटा ही.. ज्यांनी उद्योगपती म्हणून देशातील लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला. त्यांच्याविषयीचा आदर आजही लोकांमध्ये दिसतो. पण अशा मोठ्या उद्योग समूहात जेव्हा कलह निर्माण होतो तेव्हा तो केवळ एका मोठ्या उद्योग समूहातील वाद न रहाता देशाच्या विकासाचा आणि विश्वासाचा मुद्दा बनतो.
टाटा उद्योग समूहातील वाद हा एन. चंद्रशेखरन आणि नोएल टाटा केवळ दोन व्यक्तींमधील किंवा पदावरील वाद नसून, तो टाटा समूहाची रचना, सर्वोच्च नियंत्रण आणि देशाचे हित यांच्याशी जोडलेला एक अत्यंत महत्त्वाचा कॉर्पोरेट पेच आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर समूहात निर्माण झालेली ही पोकळी आणि सर्वोच्च अधिकार कोणाकडे असावेत, यावरून सुरू असलेली रस्सीखेच आता चव्हाट्यावर आलेली पहायला मिळते आहे.