असा केला चौदा गिर्यारोहकांनी तैलबैला सुळका सर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

पिंपरी : मुळशी तालुक्‍यातील 230 फूट उंचीच्या तैलबैला सुळक्‍यावर साह्यकडा अॅडव्हेंचरच्या 14 गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली. या सुळक्‍याचा 90 अंशांतील कातळकडा आणि अंतिम टप्प्यातील अवघड चढाईमुळे गिर्यारोहकांचा पूर्णपणे कस लागला. 

आणखी वाचा :  निसर्गाचा चमत्कार - लोणार सरोवर  

पिंपरी : मुळशी तालुक्‍यातील 230 फूट उंचीच्या तैलबैला सुळक्‍यावर साह्यकडा अॅडव्हेंचरच्या 14 गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली. या सुळक्‍याचा 90 अंशांतील कातळकडा आणि अंतिम टप्प्यातील अवघड चढाईमुळे गिर्यारोहकांचा पूर्णपणे कस लागला. 

आणखी वाचा :  निसर्गाचा चमत्कार - लोणार सरोवर  

तैलबैला गावाजवळ किल्लेवजा सुळका असून तो कठीण श्रेणीमध्ये ओळखला जातो. या नैसर्गिक भिंतीवर चारही बाजूंनी आरोहण करता येते. त्यापैकी सुधागडाकडील बाजूने अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली. सर्वप्रथम चढाई करण्यासाठी अनुभवी गिर्यारोहक श्रीराम पवळे याने तयारी केली, त्याला चौधरी यांनी सुरक्षा दोर दिला. प्रथम 50 फुटांचा कातळकडा चढून श्रीराम प्रस्तराच्या कंगोऱ्यावर पोचला. त्यापाठोपाठ झुमरिंग करत चौधरी तेथे दाखल झाले. पुढील 90 अंशातील कातळकडा चढताना श्रीराम याचा कस लागला. तिरक्‍या रेषेत चढाई करत त्याने 80 फुटांवर दुसरा टप्पा घेतला. त्यानंतर पुढील 30 फूट आणि 50 फुटांवर श्रीराम पोचला. 50 फुटांची अंतिम चढाई पूर्णपणे दगड, मातीमिश्रित ठिसूळ संरचनेची (स्क्री) आहे, त्यामुळे या मार्गात अत्यंत सावध राहत आणि दगड ढासळणार नाहीत याची काळजी घेत श्रीराम सुळक्‍याच्या माथ्यावर पोचला. त्याच्यापाठोपाठ इतर गिर्यारोहक माथ्यावर दाखल झाले. 

आणखी वाचा : अबब! तब्बल सात किलोमीटर उंच धबधब्याची सैर

या मोहिमेत शैलेश मेमाणे, किरण दौंडकर, प्रणव हरगुडे, निखिल पोखरकर, राहुल खोराटे, किरण पोतले, सागर मांडेकर, सचिन पाटील, आदेश चौधरी, शिवाजी पोतले अशा 24 गिर्यारोहकांचा समावेश होता. 

महाराष्ट्रातले 5 हटके ट्रेक; यातले तुम्ही किती केलेत? (भाग-1)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen trekkers Completed Tailbaila Trek

Tags
टॉपिकस
Topic Tags: