Tourism Updates: शिमल्यात थंडीची लाट; भेटीपूर्वी जाणून घ्या हवामानाची स्थिती

Tourism Updates: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी तेथील सध्याच्या तापमानाची माहिती घेणे महत्त्वाचं आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेश Esakal

Tourism Updates: सध्या संपुर्ण भारतात (India) थंडीची लाट पसरली आहे. खासकरून उत्तर भारतात थंडीची तीव्रता खूप जास्त आहे. त्यातही हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी तेथील सध्याच्या तापमानाची माहिती घेणे महत्त्वाचं आहे. हिमाचल प्रदेशात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. लोक वर्षभर शिमल्याला जाऊन तेथील निसर्गाचा आनंद घेतात. तसं पाहिले तर येथे वर्षभर थंडी असते, परंतु सध्या भारतातील इतर भागांप्रमाणेच हिमाचल प्रदेशातही तापमानात (Temperature) लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 24 तासांत मुख्य पर्यटन स्थळे कुफरी, नारकंडा, फागू, नारकंडा आणि शिमला येथे नवीन हलकी ते मध्यम हिमवृष्टी झाली आणि राज्यात तीव्र थंडीची लाट वाढली आहे. कुल्लू, कन्नियर, लाहौल, चंबा आणि शिमला (Shimla) जिल्ह्यातील लोकांचा त्रास कमी झालेला नाही. (Cold wave in Himachal Pradesh, be sure to know the weather before going)

गुरुवारी रोहतांग आणि राज्याच्या इतर उंच पर्वतीय भागात पुन्हा बर्फवृष्टी झाली. हिमवृष्टीमुळे शेकडो रस्ते, पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि दळणवळण सेवा प्रभावित झाल्या आहेत. सततची बर्फवृष्टी आणि थंडीची लाट यामुळे अडथळे येत आहेत. पर्यटन स्थळ कुफरी येथे 3 सेमी, शिमला येथे 1.6 सेमी आणि कल्पा 1 सेमी पाऊस झाला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीमुळे 362 लिंक रोड हा राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे. लाहौल-स्पिती जिल्ह्यात सर्वाधिक १५२ रस्ते बंद आहेत. त्याचबरोबर शिमल्यात 115 आणि चंबा जिल्ह्यात 53 रस्ते बंद आहेत. 229 वीजपुरवठा आणि 176 पाणीपुरवठा योजना अजूनही खंडित आहेत.

हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमधील नैना-देवी मंदिर परिसरात 22.4 मिमी, सरकाघाट (मंडी) 9 मिमी, शिमला विमानतळावर 6.6 मिमी पाऊस पडला. दाट धुक्यामुळे बिलासपूर, हमीरपूर, सुंदरनगर शहरांमध्ये वाहन वाहतुकीवर परिणाम झाला कारण दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com