esakal | मानवाच्या प्रगतीची साक्षीदार दीक्षाभूमी; एकदा नक्की भेट द्या
sakal

बोलून बातमी शोधा

मानवाच्या प्रगतीची साक्षीदार दीक्षाभूमी; एकदा नक्की भेट द्या

मानवाच्या प्रगतीची साक्षीदार दीक्षाभूमी; एकदा नक्की भेट द्या

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्‍टोबर १९५६ साली नागवंशीयांच्या भूमीत कोटी-कोटी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. एक नवा ‘प्रकाशमार्ग’ दिला. शोषित, पीडित, वंचित तळागाळातील माणसाच्या वेदनांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वैचारिक संगराचे ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी आहे. म्हणूनच अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीवर भीमसागराला उधाण येते.

दरवर्षी धम्ममहोत्सव, सांस्कृतिक आयोजनातून बाबासाहेबांच्या क्रांतदर्शी विचारांचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा जल्लोष दीक्षाभूमीवर होतो. ही दीक्षाभूमी असंख्य लेखकांची कविता बनली आहे. साहित्यांतून बोलकी झाली. बौद्धच नव्हेतर समग्र मानवाच्या प्रगतीची साक्षीदार दीक्षाभूमी आहे. यामुळेच शासनाने दीक्षाभूमीला पर्यटनाचा दर्जा दिला.

हेही वाचा: देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी; नागपुरात हालचाली

दीक्षाभूमीवर उभारलेले स्मारक म्हणजे ‘धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश देणारे स्तूप’ आहे, असेही म्हटले जाते. दरवर्षी पंधरा लाख बौद्ध बांधवांसह इतरही धर्मीय अनुयायी पर्यटक दीक्षाभूमीला भेट देतात. २००१ पासून जपान, थायलंड, श्रीलंका येथील अनुयायी मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीकडे आकर्षित झाले आहेत.

पर्यटकांचे विशेष आकर्षण

नागपूर येथील दीक्षाभूमी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्धधर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर गेली ६० वर्षे हे स्थळ केवळ देशातीलच नव्हे; तर जगभरातील बौद्धधर्मियांसाठी पवित्र मानले जाते. या ठिकाणी उभारण्यात आलेला भव्य स्तूप येथे येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. देशातील बोधगया या शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधीवृक्ष आहे.

हेही वाचा: सुधीर मुनगंटीवारांची मुलाखत घेणारी स्वामीनी झाली डीआयजी!

दीक्षाभूमी ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ

यापूर्वी दीक्षाभूमीला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा दिला होता. मात्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला. त्यानुसार पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली होती.

दीक्षाभूमीची प्रकाश पाऊले

  • दीक्षाभूमीपासून १५ किलोमीटर अंतरावर शांतीवन स्तूप

  • दीक्षाभूमीपासून १४ किलोमीटर अंतरावर ड्रॅगन पॅलेस

हेही वाचा: पाठदुखी : जाणून घ्या पाठ न सोडण्याचे कारण अन् उपाय

दीक्षाभूमीची रचना

दीक्षाभूमीवर स्मारक उभारले आहे. वास्तूकलेचा हा उत्तम नमुना आहे. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी सुरुवातील ५ हजार लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला होता. दीक्षाभूमीवरील स्मारकाचा १२० फुटाचा तयार केलेला डोम अतिशय आकर्षक आहे. येथे भेट दिल्यानंतर मनाला मिळणारे समाधान मोठे आहे.

loading image
go to top