Budget Trips: ‘या’ देशांमध्ये आहे Indian Rupee Value जास्त, तेव्हा स्वस्तात फिरा आणि मनसोक्त शॉपिंग करा

Cheap travel countries: अमेरिका, युरोपातील अनेक देशातील चलनाचे मूल्य Currency हे भारतीय रुपयाच्या तुलनेत अत्यंत जास्त असल्याने असे देश फिरणं हे अत्यंत खर्चिक ठरतं. मात्र तुम्हाला माहित आहे का असे अनेक देश आहेत जिथं रुपयाचं मूल्य Rupee Value हे तिथल्या चलनाहून जास्त आहे
cheap travel countries
cheap travel countriesEsakal

Cheapest Country to Visit: परदेशात फिरण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र परदेशात फिरायचं म्हंटलं तर लाखोंच्या घरात खर्च होणार. तिकिट खर्चापासून अगदी राहणया खाण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागणार, शिवाय खरेदी करणं देखील महाग पडेल या विचाराने अनेकजण परदेशवारीचे Foreign Tour प्लॅन रद्द करतात. Foreign Tour Plan know the countries where Indian rupee value is high

अमेरिका, युरोपातील अनेक देशातील चलनाचे मूल्य Currency हे भारतीय रुपयाच्या तुलनेत अत्यंत जास्त असल्याने असे देश फिरणं हे अत्यंत खर्चिक ठरतं. मात्र तुम्हाला माहित आहे का असे अनेक देश आहेत जिथं रुपयाचं मूल्य Rupee Value हे तिथल्या चलनाहून जास्त आहे.

त्यामुळे तुम्ही अशा देशामध्ये अगदी स्वस्तामध्ये फिरण्याची तसंच शॉपिंग Shopping करण्याची मजा लूटू शकता. त्यामुळे तुम्ही परदेशात फिरण्यासाठी अशा देशांची लिस्ट नक्कीच तयार करू शकता, जिथे रुपयांचं मूल्य अधिक आहे शिवाय हे देश फिरण्यासाठी देखील उत्तम आहेत.

इंडोनेशिया

इंडोनेशिया हे आशियातील एक महाद्विप असून इथले सुंदर समुद्र किनारे आणि समुद्राचं निळंशार पाणी पर्यटकांना आकर्षित करतं. तसंच इथं अनेक बौद्ध आणि हिंदू मंदिरं देखील आहेत. यासोबतच सुंदर निसर्ग आणि आल्लाददायक वातावरण तुमच्या मनाला शांती देणार आहे.

खास गोष्ट म्हणजे इंडोनेशियाचं चलन इंडोनेशियाई रुपयाचं मूल्य हे रुपयापेक्षा अत्यंत कमी आहे. १ भारतीय रुपयाचं मूल्य इथं १८३.६२ एवढं आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे १०० रुपये असतील तर ते १८, ३६२ इंडोनिशिया रुपयांएवढं आहे. म्हणजेच या देशामध्ये तुम्ही कमी पैशात चांगली मजा लूटू शकता.

व्हिएटनाम

व्हिएटनाम हा दक्षिण आशियातील एक देश असून जगभरातील अनेक पर्यटक या देशाला दरवर्षी भेट देत असतात. इथले सुंदर समुद्र किनारे, चविष्ट जेवण आणि संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते.

शिवाय इथं भारतातील १ रुपया हा २८७.२९ डोंग इतका आहे. म्हणजेच तुमच्याकडील १०० रुपये इंथ २८, ७२८ डोंग एवढे आहेत. त्यामुळे खिशात कमी पैसे ठेवून तुम्ही इथं फिरण्याची बिनधास्त मजा लूटू शकता.

कंबोडिया

कंबोडिया हा देश देखिल फिरण्यासाठी अत्यंत स्वस्त आहे. कारण इथं एका भारतीय रुपयाची किंमत ५०.१० कंबोडियन रियल एवढी आहे. इथं आजही अनेक ऐतिहासिक वास्तूंचं उत्तम प्रकारे जतन करून ठेवण्यात आलं आहे. अनेक पर्यटक इथल्या जुन्या इमारती, म्युझियम तसंच समुद्र किनारे पाहण्यासाठी येत असतात.

हे देखिल वाचा-

cheap travel countries
Foreign Tour करायचीय, मग या देशांमध्ये बिना व्हिसा फिरू शकतात भारतीय, मग कधी करताय प्लॅन?

लाओस

या देशामध्ये अनेक सुंदर टुमदार गावं आणि मनमोहक निसर्गासोबत आकर्षक धबधबे आहेत. इथंल चलन किप म्हणून ओळखलं जातं. इथं १ रुपयाचं मूल्य २३४.९६ किप एवढं आहे. त्यामुळेत लाओसमध्ये तुम्ही कमी पैशात व्हेकेशन एन्जॉय करू शकता.

कोस्टा रिका

कोस्टा रिका हा देश त्याच्या समृद्ध जैवविविधतेतासीठी ओळखला जातो. इथल्या निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तसचं डेस्टिनेशन वेडिंगसाठी अनेकजण या देशाची निवड करतात. इथं १ रुपयाचं मूल्य ८.६५ कोलन इतकं आहे.

या देशांसोबतच श्रीलंका, नेपाळ, पराग्वे, उझबेगिस्तान, साउथ कोरिया, मंगोलिया या देशांमध्ये देखील रुपयांचं मूल्य जास्त असल्याने तुम्ही या देशांमध्ये स्वस्तामध्ये तुमचं फॉरेन ट्रीपचं स्वप्न पूर्ण करू शकता.

हे देखिल वाचा-

cheap travel countries
Foreign Tour Plan: हॅपी वेकेशन्ससाठी एक्सप्लोर करा व्हिसा नकारन्याचे प्रमाण कमी असलेले हे देश ...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com